पुणे : पुणे शहरात मेट्रो सुरु झाली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे शहरातील प्रवास करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. पण पुणे मेट्रोमुळे नागरिकांचा प्रवास सोईस्कर झाला आहे. पुणे मेट्रोच्या रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मार्गाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मेट्रोच्या या विस्तारित मार्गामुळे मेट्रोच्या प्रवासी संख्येत २० हजारांची वाढ झाली आहे. यामुळे मेट्रोची एकूण दैनंदिन प्रवासी संख्या सरासरी ८० हजारांवर पोहोचली आहे. या मार्गावरील येरवडा स्थानक अद्याप सुरू झाले नाही. येरवडा स्थानक सुरू झाल्यानंतर प्रवासी संख्येत आणखी वाढ होणार आहे.
मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या आधी सुमारे ६० हजार होती. रामवाडीपर्यंत विस्तारित मार्ग सुरू झाल्यानंतर दैनंदिन प्रवासी संख्या ८० हजारांवर पोहोचली आहे. विस्तारित मार्ग सुरू होण्याआधी मेट्रोचे दैनंदिन उत्पन्न सुमारे १० लाख रुपये होते. आता मेट्रोचे दैनंदिन उत्पन्न १२ लाख ५० हजार रुपयांवर पोहोचले आहे.
मेट्रोच्या तिकीट काढल्यानंतर सुटे पैसे परत दिले जात नसल्याचं अनेक प्रवशांनी सांगितलं आहे. प्रगती सांगळे नावाच्या तरुणीने १८ रुपयांचे तिकीट काढण्यासाठी ५० रुपये दिले होते. तिला ३० रुपये परत देण्यात आले. तिने २ रुपयांची मागणी केली. मात्र सुटे पैसे नसल्याचे कारण देण्यात आले. याबाबतचा व्हिडीओ प्रगती सांगळे हिने सोशल मीडियावर शेअर केला होता.
महत्वाच्या बातम्या-
-‘एका ठोक्यात २ तुकडे करण्याची माझ्यात धमक’; अजित पवारांचं वक्तव्य
-सुनेत्रा पवारांच्या सोबतीला सर्जा-राजाची जोडी! बैलगाडीतून मिरवणूक काढत गावकऱ्यांकडून स्वागत
-‘आपला शब्द म्हणजे शब्द, राहुल कुल राष्ट्रवादीत येऊ द्या, उद्याच मंत्री करतो’; अजित पवारांचं वक्तव्य
-‘महायुतीची वज्रमूठ दिवसेंदिवस घट्ट होतेय, आपणही मतदान करून सामील व्हावे’; सुनेत्रा पवारांचे आवाहन