पुणे : पुण्यातील मनसेचे माजी नगरसेवक फायरब्रँड नेते म्हणून ओळख असणाऱ्या वसंत मोरे यांनी मनसेला राजीनामा दिल्यानंतर पुणे लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली आहे. वसंत मोरे यांनी राजीनाम्यानंतर महाविकास आघाडीतील बड्या नेत्यांची भेट घेतली. मोरे हे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. मात्र आता महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकर यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे मोरे यांना उमेदवारी मिळण्याच्या शक्यताच उरली नाही. अशातच सोशल मीडियातून मोरे यांनी या सर्व घडामोडींवर सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
‘तरी पण निवडणूक एकतर्फी कशी होते बघतोच मी’ असे सांगत अपक्ष निवडणूक लढविण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. वसंत मोरे यांनी गेल्या आठवड्यात मनसेचा राजीनामा दिला. लोकसभा निवडणूक लढविण्याची जाहीर इच्छा त्यांनी बोलून दाखविली होती. काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी, यासाठी ते आग्रही होते. त्यासंदर्भात त्यांनी महाविकास आघाडीचे नेते शरद पवार, संजय राऊत यांची भेट घेतली होती. पुण्यातील त्यांचे एकेकाळचे सहकारी, कसब्याचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर आणि प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे त्यांच्या भावना समजून घेतली असेही मोरे यांनी म्हणाले होते.
तरीपण निवडणूक एकतर्फी कशी होते बघतोच मी… pic.twitter.com/H6wQ7c7sIW
— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) March 20, 2024
“ही निवडणूक एकतर्फी होणार, तर त्या व्यक्तींना एकच सांगू इच्छितो की, जोवर पुणे शहरात वसंत मोरे आहे, तोपर्यंत ही निवडणूक एकतर्फी होऊ देणार नाही. मी कोणत्याही पक्षात जाण्यासाठी मनसे पक्ष सोडला नाही. १०० टक्के वसंत मोरे हा निवडणुकीच्या रिंगणात असणार असून ‘मी एकला चलो रे’च्या भूमिकेवर ठाम आहे”, असं वसंत मोरे म्हणाले आहेत.
“निवडणुकीत आणखी थोडी रंगत येऊ द्या, माझ्या वाटेत कोणी काटे टाकले ते सर्व काटे योग्यवेळी मी बाहेर काढणार. या सर्व बाबी जाहीरपणे व्यासपीठावर पुराव्यासह सांगणार. आता माझी अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारी आहे. तसेच, एकतर्फी निवडणूक व्हायची असती तर मागील दहा दिवसांत कोणाकोणाचे फोन आले, या गोष्टी योग्यवेळी पुणेकर नागरिकांसमोर आणणार”, असं म्हणत वसंत मोरे यांनी भाजप नेत्यांना सुनावलं आहे.
“कुठपर्यंत पोहोचला राम राम * गेली 21 वर्ष मी सातत्याने श्री क्षेत्र नारायणपूर या ठिकाणी दत्तगुरूंच्या दर्शनासाठी जात असतो नेहमीप्रमाणे आजही सकाळी मी नारायणपूरला गेलो आणि दर्शन झाल्यानंतर मी त्या ठिकाणी मंदिरा बाहेर बसणाऱ्या भिक्षुक लोकांना सातत्याने काही दक्षना देत असतो त्यापैकी pic.twitter.com/A7SyyN5kyL
— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) March 21, 2024
दरम्यान, आता वसंत मोरे यांना महाविकास आघाडीकडून तरी उमेदवारी मिळणार नसल्याची दाट शक्यता आहे. आता वसंत मोरे अपक्ष म्हणून निवडणूक लढणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मावळमध्ये महायुतीचा तिढा कायम; ‘बारणेंना उमेदवारी दिली तर आम्ही प्रचार करणार नाही’
-महायुतीत वादाची ठिणगी “शिवतारेंना आवरा, त्यांच्यामुळे महायुतीतील वातावरण खराब होतंय”
-“शिवतारेंमुळे महायुतीला तडा जातोय, त्यांनी अजितदादांची जाहीर मागावी, अन्यथा आम्ही….”
-‘श्रीनिवास पवारांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढला जातोय’; युगेंद्र पवारांची प्रतिक्रिया
-‘आपल्या माणसांसमोर मन मोकळे करायचे नाही का?’ सुप्रिया सुळेंकडून श्रीनिवास पवारांची पाठराखण