पुणे : पुणे शहरात भाजपकडून आचारसंहितेचे सर्रास उल्लंघन होत असल्याने काँग्रेसचे मोहन जोशी आणि काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांची भेट घेत कारवाई करण्याची मागणी केली. २ दिवसात कमळ चिन्ह पुसले नाहीत तर, परवा दिवशी निवडणूक आयोगाला हाताचा पंजा भेट देणार आहे.
देशात आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र तरी भाजपकडून शहरातील भिंतीवर कमळ हे पक्षचिन्ह काढले जात आहे. निवडणूक आयोगाने यांना आवर घालावा. पुणे शहरातील भिंती विद्रुप करून टाकल्या आहेत. दोन दिवसात कारवाई न केल्यास निवडणूक आयोगाला हाताचा पंज्जा भेट देणार. भाजपकडून निवडणुका हायजॅक करण्याच्या प्रयत्न चालू आहे”, असा गंभीर आरोप रविंद्र धंगेकर म्हणाले आहेत.
पुणे शहरात शासकीय पैशाने मोदीचे फोटो आणि कमळ चिन्ह काढले आहे. आचारसंहिता लागून ७२ तास उलटले तरी देखील फलक काढलेले नाहीत. ताबडतोब याच्यावर कारवाई झाली पाहिजे. २४ तासात कारवाई करा अन्यथा, आम्ही फोटो काढून आणून देऊ. आदर्श आचारसंहितेचा भंग भारतीय जनता पक्ष करत असेल, तर ते आम्ही सहन करणार नाही.
दरम्यान, पुणे लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने अद्याप उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही. पुणे लोकसभा निवडणकीच्या उमेदवारी बाबत बोलताना रवींद्र धंगेकर आणि मोहन जोशी आम्ही दोघेही इच्छुक असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आता पुण्यातून कोणाला उमेदवारी मिळते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“जेव्हा मी पुणे लोकसभेच्या रिंगणात उतरेल त्यावेळेस खऱ्या अर्थाने रंगत येईल”- वसंत मोरे
-लागा कामाला! आढळरावांना अजित पवारांची सूचना; शिरूरमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला?
-“फडणवीस कधीच चुकीचा पत्ता टाकत नाहीत, त्यांनी जाहीर केलेला उमेदवार निश्चित विजयी होतील”
-पिंपरी-चिंचवडमध्ये ‘स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यावसाय; पोलिसांकडून ४ तरुणींची सुटका
-मावळमधून श्रीरंग बारणे हेच महायुतीचे उमेदवार; भाजपचं बंड शमलं