पुणे : लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. एकीकडे सर्व पक्ष, राजकीय नेते, वाटाघाटी जागावाटप आणि प्रचाराच्या कामात आहेत. तर दुसरीकडे अशा पुणे शहरात राजकीय बॅनर्सची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. काही वर्षात राज्यातील अनेक नेत्यांनी पक्ष बदलले पक्षांनी भूमिका बदलल्या, बंड केले या सर्वामुळे राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचं पहायला मिळालं.
राजकारणातील सत्तांतर आणि राजकीय पक्ष, नेत्यांच्या भूमिकेवरुन राजकारणात मोठा गदारोळ झाला. एका पंचवार्षिक काळात मोठा सत्ताबदल पहायला मिळाला. यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकही या राजकारणाने हैराण झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर पुणे शहरात ‘जागृत पुणेकर’, या नावाने लावण्यात आलेल्या या बॅनर्सची जोरदार चर्चा सुरु आहे.
”मी आमच्या पक्षाशी व पक्षाच्या ध्येय धोरणाशी आणि मतदारांशी ५ वर्ष प्रामाणिक राहीन, कोणत्याही दुसऱ्या पक्षात जाणार नाही. गेलो तर पुन्हा मला किंवा आमच्या घरातील व्यक्तीला निवडून देऊ नका,” जो उमेदवार आपल्या परिचय पत्रात असे लिहिन त्यांनाच मतदान करा, अशा आशयाचा मजकूर शहरात लावण्यात आलेल्या बॅनर्सवर लिहिण्यात आला आहे.
“हे बॅनर्स कोणी लावले, हे आम्हाला माहिती नाही. मात्र, या बॅनर्समधील मजकुरांशी आम्ही सहमत आहोत. यावरून जनतेच्या मनात नेत्यांविरोधात नाराजी आहे, हे दिसून येते. लोकांना पक्ष आणि पक्षाच्या धोरणांशी प्रामाणिक राहणारा उमेदवार हवा आहे, हे स्पष्ट आहे, अशी सजग नागरिक मंचाचे कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुणे शहरातील अनेक ठिकाणी हे बॅनर्स लावण्यात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, हे बॅनर्स कोणी लावले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
महत्वाच्या बातम्या-
-“ही बैठक सकारात्मक, येत्या ३ दिवसांत निर्णय होईल”; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीनंतर मोरेंची प्रतिक्रया
-लोकसभा उमेदवारीवरून मोरे ‘वंचित‘ आता घेणार प्रकाश आंबेडरांची भेट
-श्रीरंग बारणे यांच्या हाती पुन्हा धनुष्यबाण; पण ठाकरेंच्या मशालीला शमवणार का?
-मावळात अखेर श्रीरंग बारणेच! शिवसेनेकडून आठ उमेदवारांची यादी जाहीर
-निवडणूक आयोगाचा अजितदादांना मोठा धक्का; लोकसभा निवडणुकीसाठी मिळणार नाही ‘घड्याळ’