पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मनसेमधून नुकतेच बाहेर वसंत मोरे हे पुणे लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यांना महाविकास आघाडीकडून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या मोरेंनी महाविकास आघाडीतील नेत्यांची भेट घेतली होती. काँग्रेसने गुरुवारी उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामुळे वसंत मोरे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली नाही. मात्र तरीही वसंत मोरे हे निवडणूक लढण्यावर ठाम आहेत.
“मी आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याच्या निर्णयावर ठाम आहे. कोणत्याही परिस्थितीत मी निवडणुकीच्या रिंगणात असेनच” असा दावा माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी गुरुवारी पुन्हा एकदा केला आहे. त्याचवेळी काँग्रेसकडून लोकसभा उमेदवार जाहीर होताच वसंत मोरे यांनी ठेवलेलं व्हॉट्सअप स्टेटस चर्चेचा विषय ठरलं आहे.
‘एकदा ठरलं की ठरलं’ म्हणतं वसंत मोरे यांनी शड्डू ठोकला आहे. वसंत मोरे यांना महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती. परंतु गुरुवारी रात्री काँग्रेसने आपली तिसरी उमेदवार यादी जाहीर करत पुण्यातून कसबा पेठेचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना संधी दिली आहे. त्यामुळे वसंत मोरे निराश झाल्याचं दिसत आहेत. त्यानंतर त्यांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवत निवडणूक लढण्यावर ते ठाम असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पुण्यात तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता आहे.
‘पक्षाकडे पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची मागणी मी केली होती. परंतु पक्षाच्या कोअर कमिटीने वरिष्ठांना चुकीची माहिती पुरवली,’ असा आरोप वसंत मोरे यांनी केला होता. त्यावर आता “मी पुणे लोकसभेची जागा लढविणार आहे”, यावर वसंत मोरे ठाम आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘पुण्याच्या सेवेसाठी मुरलीधर मोहोळ हक्काचे खासदार असतील’; पंकजा मुंडेंचा विश्वास
-काँग्रेस अखेर ठरलं! आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर