पुणे : पुण्यातील फायरब्रँड नेते वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडीकडून पुणे लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाली आहे. वसंत मोरे यांनी आपल्या स्टाईलने धुमधडाक्यात प्रचाराला सुरवात केली आहे. प्रचारावेळी त्यांनी त्यांची स्टाईल जपत धडक मोर्चा, जाब विचारणे, कारावाईची मागणी करणे ही पद्धत कायम ठेवली आहे.
बुधवारी ससून रुग्णालयात उंदीर चावल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही धक्कादायक बाब समोर आल्यानंतर ससूनमधील अस्वच्छतेचा प्रश्न उपस्थित झाला. हे पाहून उंदराचे पिंजरे घेऊन वसंत मोरे थेट हॉस्पिटलच्या मुख्य अधिकाऱ्याच्या दालनात पोहचले. वसंत मोरेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत प्रशासनाचे वाभाडे काढले आहेत. या पोस्टवरुन त्यांनी ससूनच्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं जात आहे.
काल वंचित बहुजन आघाडी मधील माझा पहिलाच दिवस आणि आमच्या पुण्याच्या ससून हॉस्पिटल मधून बातमी आली अपघाताने जखमी झालेल्या तरुणाला ससून हॉस्पिटलच्या ICU विभागात ऍडमिट असताना त्या तरुणाला उंदराने चावा घेतल्यामुळे त्या तरुणाचा मृत्यू झाला म्हणून ससून रुग्णालयाच्या विरोधात हॉस्पिटलच्या pic.twitter.com/KJMBiPzz07
— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) April 5, 2024
ससून रुग्णालयाच्या विरोधात हॉस्पिटलच्या मुख्य अधिकाऱ्याच्या दालनात जाऊन त्यांना उंदराचे पिंजरे भेट दिले. जर जबाबदार लोकांवर कारवाई केली नाही आणि आरोग्य बाबतीमध्ये निर्णय घेतले गेले नाहीत तर भविष्यात यापेक्षाही मोठाले पिंजरे आणून संबंधित अधिकाऱ्यांना पिंजऱ्यात कोण येतील, असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-सावधान! सूर्य आग ओकतोय, राज्यावर उष्माघाताचे संकट; ‘येथे‘ सर्वाधिक धोका
-Election Commission इन ॲक्शन मोड! ओपिनियन आणि एक्झिट पोलबद्दल मोठा निर्णय