पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी पहिला टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. महाराष्ट्र मध्ये विदर्भातील सहा जागांवर आज मतदार आपला हक्क बजावतील. तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जागांसाठी देखील आता नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे वाढत्या उन्हासोबत या भागातील राजकीय वातावरण देखील चांगले तापताना दिसत आहेत. पुणे, बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा 29 एप्रिल रोजी पार पडणार आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मुरलीधर मोहोळ, बारामतीच्या सुनेत्रा पवार आणि शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा घेण्यासाठी वरिष्ठ पातळीवर नेत्यांचा आग्रह होता. अखेर पश्चिम महाराष्ट्रातील निवडणुकांच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा 29 एप्रिल रोजी पुण्यामध्ये आयोजित केली जाणार आहे.
2014 आणि 2019 साली नरेंद्र मोदी यांनी पुण्यात घेतलेल्या सभांना मोठा प्रतिसाद मिळाला होता. पुण्यामध्ये अनिल शिरोळे हे २०१४ साली तर गिरीश बापट २०१९ साली विक्रमी मतांनी विजयी झाले होते. आता मुरलीधर मोहोळ यांना देखील मोठे मताधिक्य मिळवण्यासाठी भाजप तसेच महायुतीतील घटक पक्षांकडून जोरदार मोर्चे बांधणी केली जात आहे. त्यामध्ये आता मोदी यांची सभा पार पडणार असल्याने महायुतीला आणखीन ताकद मिळण्याचा विश्वास नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘ही निवडणूक गावकी-भावकीची नाही तर देशाचा पंतप्रधान ठरवण्याची’; आढळराव पाटलांचा कोल्हेंना खोचक टोला
-“नागरिकांना कायम उपलब्ध राहून काम करणार, हीच माझी गॅरंटी” – आढळराव पाटील
-इंटीमेट सीन्स करण्याआधी अभिनेत्री काय करतात? विद्या बालनने सांगितला तिचा अनुभव
-पाडाला पिकला आंबा!!! उन्हाळ्यात आंबा खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहिती आहेत का?
-“सगळं साहेबांनी केलं, मग मी काय…”, अजित पवारांकडून बारामतीत जोरदार हल्लाबोल