पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पुण्यातून पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे. मुरलीधर मोहोळ हे पुण्याचे माजी महापौर आणि भाजपचे सरचिटणीस आहेत. मोहोळ यांच्यावर भाजपने पुण्याची जबाबदारी दिली. मुरलीधर मोहोळ यांच्याबरोबर लोकसभेसाठी भाजपकडून आमदार जगदीश मुळीक यांचे नावही चर्चेत होते. मोहोळ यांना उमेदवारी मिळाल्यानंतर आता जगदीश मुळीक यांनी फेसबुकवर पोस्ट लिहली आहे.
“कोणतेही पद नसताना माझ्यासाठी जनतेने आणि कार्यकर्त्यांनी दाखवलेले प्रेम पाहता मी कायम कृतज्ञ आहे. जनतेचे प्रेम आणि विश्वास पारदर्शक, स्वच्छ काम असेच कायम ठेवणे ही माझी जबाबदारी आहे. जी मी पूर्ण निष्ठेने पार पाडणार आहे. पुन्हा एकदा तमाम जनता आणि कार्यकर्त्यां,पदाधिकाऱ्यांचे मनापासून धन्यवाद.” जगदीश मुळीक यांची ही पोस्ट चर्चेत आली आहे. पक्षावर निष्ठा कायम ठेवल्याबद्दल सर्वांनी त्यांचे कौतूक केले आहे. भविष्यात आपल्यालाही उत्तम संधी मिळणार आहे, हा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे”, असं जदीगश मुळीक फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
पुणे लोकसभा उमेदवारीसाठी भाजपमध्ये मुरलीधर मोहोळ आणि जगदीश मुळीक यांच्यात रस्सीखेच सुरु होती. अनेकांनी भावी खासदार म्हणून शहरात पोस्टर्स लावले होते. या सर्व पार्श्वभूमीवर नुकतीच जगदीश मुळीक यांनी भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चाही झाली होती. त्यानंतर आता जगदीश मुळीक यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-भाजपने तर डाव टाकला आता काँग्रेस काय खेळी खेळणार; मोहोळांना टक्कर देण्यासाठी कोणाला देणार उमेदवारी?
-आता वेल्हे तालुक्याचं नाव ‘राजगड’; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय
-मुरलीधर मोहोळांचा वसंत मोरेंना फोन; भाजपमध्ये जाणार? मोरे म्हणाले, ‘मी माझा निर्णय..’