पुणे : पुणे लोकसभेसाठी भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहोळ यांनी प्रचाराची पहिली फेरी देखील पूर्ण केली. शहर भाजपमधील बहुतांश नेते त्यांच्यासोबत दिसत असताना उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुक राहिलेले माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक मात्र पक्षीय कार्यक्रमापासून दूर होते. आता महाराष्ट्र भाजपचे सर्वेसर्वा असणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर मुळीक बंधूंची नाराजी दूर झाली असून ते प्रचारात सहभागी होताना दिसत आहेत. त्यामुळे फडणवीसांची शिष्टाई यशस्वी झाल्याचं बोलले जात आहे.
पुणे लोकसभेसाठी भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांच्यासह जगदीश मुळीक, माजी खासदार संजय काकडे, माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर, शिवाजी मानकर हे इच्छुक होते. मात्र मोहोळ यांच्या पारड्यात भाजपकडून उमेदवारीचे माप टाकण्यात आल्याने मुळीक यांची उघड नाराजी दिसून आली. त्यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे देखील शहरात बरीच राजकीय चर्चा रंगली होती. जगदीश मुळीक हे वडगावशेरी विधानसभेचे आमदार देखील राहिलेले असून त्यांची नाराजी भाजपसाठी डोकेदुखी ठरणारी होती.
पुणे लोकसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. मुरलीधरजी मोहोळ यांच्या प्रचारार्थ वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी उपस्थित राहून महिला पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला, तसेच श्री. मुरलीधरजी यांना प्रचंड… pic.twitter.com/ohB0sBFp6M
— Jagdish Mulik (Modi Ka Parivar) (@jagdishmulikbjp) March 24, 2024
दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर जगदीश मुळीक यांच्यासह बंधू योगेश मुळीक प्रचारात सक्रियपणे सहभागी होऊ लागले आहेत. आज वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात घेण्यात आलेल्या महिला आघाडीच्या आढावा बैठकीला मुळीक यांनी हजेरी लावली, त्यांनी स्वतः फेसबुक पोस्टच्या माध्यमातून बैठकीला उपस्थिती लावल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे भाजपमध्ये सुरू असणाऱ्या नाराजी नाट्यावर सध्या पडदा पडल्याचं दिसत आहे.
वडगावशेरी मतदारसंघात भाजपचे गणित जुळणार
पुणे लोकसभेत येणाऱ्या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदारसंख्या आहे. या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे हे आमदार आहेत. तर मतदारसंघात मोठी ताकद असणारे माजी आमदार बापू पठारे हे देखील भाजपमध्ये आहेत. मोहोळ यांना उमेदवारी दिल्यानंतर दोघेही सक्रियपणे त्यांच्या प्रचारात सहभागी झाले. आता जगदीश मुळीक यांची देखील नाराजी दूर झाल्याने भाजपला येथून मोठे मताधिक्य मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“आढळराव पाटलांना बदला घ्यायचाय, पण मी मायबाप जनतेकडे आशिर्वाद मागतोय”
-लाल मातीतला पैलवान दिल्लीत पाठवायचाय! मोहोळांसाठी हजारो पैलवानांची फौज प्रचाराच्या मैदानात
-‘आगामी काळात विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम होणार’; सुप्रिया सुळेंची इंदापुरातली सभा तुफान गाजली
-आढळराव पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार; नीलम गोऱ्हे म्हणाल्या, ‘त्यांनी आत्पधर्म म्हणून..’