पुणे : भाजपच्या महाराष्ट्रातील पहिल्या यादीमध्ये पुणे लोकसभेसाठी पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदारी जाहीर करण्यात आली. पुणे लोकसभेसाठी भाजपमध्ये रस्सीखेच सुरु होती. इच्छुकांमध्ये मुरलीधर मोहोळ, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, सुनील देवधर, शिवाजी मानकर हे उमेदवारीसाठी इच्छुक होते. उमेदवारी जाहीर होताच मोहाळांनी प्रचारास सुरुवातही केली आहे.
पुणे लोकसभेसाठी इच्छुक असलेले माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक हे उमेदवारी न मिळाल्याने पक्षावर नाराज असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीतील इतर मित्र पक्षांच्या विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका होत आहेत. पुण्यातील ६ विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात आज महायुतीची बैठक झाली. बैठकीला भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक अनुपस्थित होते.
पक्षाच्या बैठकांना जगदीश मुळीक यांची उपस्थिती नसल्याने मुळीकांची नाराजी दिसून येत आहे. याबाबत राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगू लागली आहे. मोहोळांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मुळीकांनी ‘मी सदैव जनतेसाठी’ अशी फेसबुक पोस्टसुद्धा केली होती. महायुतीची आज विधानसभानिहाय बैठक मुळीक यांच्या वडगाव शेरी मतदारसंघातच झाली. बैठकीला जगदीश मुळीक उपस्थितीत नसल्यामुळे ते पक्षावर नाराज असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“पुण्यातल्या भिंतीवरची ‘कमळ‘ पुसा, नाहीतर आयोगाला ‘हाताचा पंजा‘ भेट देऊ”
-“जेव्हा मी पुणे लोकसभेच्या रिंगणात उतरेल त्यावेळेस खऱ्या अर्थाने रंगत येईल”- वसंत मोरे
-लागा कामाला! आढळरावांना अजित पवारांची सूचना; शिरूरमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला?
-“फडणवीस कधीच चुकीचा पत्ता टाकत नाहीत, त्यांनी जाहीर केलेला उमेदवार निश्चित विजयी होतील”
-पिंपरी-चिंचवडमध्ये ‘स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यावसाय; पोलिसांकडून ४ तरुणींची सुटका