पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील बाणेर आणि पर्वती भागामध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार, मेधा कुलकर्णी, आमदार माधुरी मिसाळ, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील, गणेश बिडकर यांच्या सह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
‘गेल्या १० वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली आपल्या देशाने सर्व क्षेत्रात प्रगती केली आहे. याच १० वर्षांत चांदणी चौकातील पुल, रस्ते, मेट्रो, इलेक्ट्रिक बस आल्या. तर सर्वाधिक इलक्ट्रिक बसेस पुण्यात आल्या आहेत. यामुळे प्रदूषण कमी झाले असून पुणेकर नागरिकांचा प्रवास सुखकर झाला आहे. हे सर्व नरेंद्र मोदी यांच्यामुळेच शक्य झाले’ असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
पुणेकरांचा एकच निर्धार, पुन्हा एकदा आपलं मोदी सरकार !!!
माझे मार्गदर्शक आणि राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख मार्गदर्शनात पर्वती विधानसभा मतदारसंघात माझ्या प्रचारार्थ भव्य-दिव्य जाहीर सभा पार पडली. प्रचंड संख्येने उपस्थित असलेला जनसमुदाय पंतप्रधान… pic.twitter.com/jLM6b24q4g
— Murlidhar Mohol (Modi Ka Parivar) (@mohol_murlidhar) May 9, 2024
‘२०१४ पासून बदललेले पुणे आपल्याला बघायला मिळाले आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी नवीन प्रकल्प पुण्यात येतील आणि पुण्याचा कायापालट होईल. त्यासाठी तिसर्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी १३ तारखेला मतदानावेळी मुरलीधर मोहोळ यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे’, असे आवाहन देखील फडणवीसांनी केले आहे.
‘१४० कोटी लोकांचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोधी पर्याय उपलब्ध करू शकले नाहीत. ‘सबका साथ सबका विकास’ नरेंद्र मोदी करीत आहेत. तर दुसर्या बाजूला विरोधकांच्या इंजिनात फक्त कुटुंबातील व्यक्तींसाठी जागा आहे आणि नरेंद्र मोदी यांच्या इंजिनात सर्वसामान्यांना देखील जागा आहे’, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना सणसणीत टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“आपण कोणत्याही शूटिंगला जाणार नाही, त्यामुळे पूर्णवेळ लोकांसाठी, विकास कामासाठी”- आढळराव पाटील
-मुस्लिमांची जमीन वाचवली त्यांनाच पाठिंबा; अनिस सुंडकेंसाठी एकवटले मुस्लिम धर्मगुरू
-मतदानाला उरले तीन दिवस; पुण्यात कोण ठरतंय सरस? नेमकी परिस्थिती काय, नक्की वाचा
-राज ठाकरेंच्या सभेनिमित्त वाहतूकीत बदल; जाणून घ्या कशी आहे वाहतूक व्यवस्था?