पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी प्रमुख राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केल्याने आता प्रचाराला रंग चढू लागला आहे. पुणे लोकसभेच्या आखाड्यात भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मोहोळ हे पैलवानकीचा वारसा असणाऱ्या मोहोळ कुटुंबातून येत असल्याने त्यांचे लाल मातीशी अनेक वर्ष संबंध राहिलेले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या आपल्या सहकाऱ्याला साथ देण्यासाठी हजारोंच्या संख्येने पैलवान आज कर्वेरोडवर असणाऱ्या अंबर हॉलमध्ये जमले होते. यावेळी लाल मातीतला पैलवान दिल्लीत पाठवायचा, असा निर्धार त्यांच्याकडून करण्यात आला.
मोहोळ यांच्या प्रचारासाठी हजारो मल्ल पुण्यात शड्डू ठोकणार आहेत. आपल्यातीलच एका पैलवानाला थेट लोकसभेसाठी संधी मिळाल्याने विजयासाठी झोकून देऊन काम करण्याचा निर्धार यावेळी पुणे आणि परिसरातील मल्लांनी एकदिलाने करण्यात आला. पै. मोहोळ यांचे मताधिक्य वाढवण्यासाठी घर ना घर पिंजून काढून असाही निश्चय करत यासाठी कृती आराखडाही तयार करण्यात आला आहे. कुस्ती क्षेत्रामध्ये हिंद केसरी, महाराष्ट्र कसेरी तसेच आंरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक विजेते असणारे अनेक पैलवान यावेळी उपस्थित होते.
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?
“मी अनेक वर्षे लाल मातीशी निगडित आहे. आजच्या बैठकीला लाल मातीशी निगडित असणारे हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक मिळवणारे राष्ट्रीय खेळाडू जमले होते. त्यांच्या सर्वांच्या मनामध्ये आपल्या माणसाला मदत करण्याची भावना आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये माझ्या प्रचारात मतदारसंघातील जवळपास ७ ते ८ हजार पैलवान सहभागी होतील. ते कायम माझ्यासोबत न राहता त्यांच्या यंत्रणेच्या माध्यमातून प्रचारामध्ये सहभागी होतील.”
या बैठकीमध्ये पुढील ४५ दिवसांचे नियोजन करण्यात आले आहे. कर्वे रस्त्यावरील अंबर हॅाल येथे झालेल्या बैठकीत महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी, विविध तालमींचे वस्ताद, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आवर्जून उपस्थित होते. पै. दीपक मानकर, पै. बापूसाहेब पठारे, पै. विकास दांगट, पै. आप्पा रेणूसे, पै. शुक्राचार्य वांजळे, पै. बाबा कंधारे, पै. हनुमंत गावडे, पै. योगेश दोडके, पै. संदीप भोंडवे, पै. विलास कथुरे, पै. ज्ञानेश्वर मांगडे, पै. विजय बनकर, पै. शिवराज राक्षे, पै. राजेश बारगुजे, पै. संतोष गरुड, पै. नितीन दांगट, पै. रामभाऊ सासवडे, पै. पंकज हरपुडे, पै. महेश मोहोळ, पै. राजू मोहोळ, पै. तात्या भिंताडे, पै. अभिजीत आंधळकर, पै. विजय जाधव, पै. अमोल बराटे, पै. शिवाजी तांगडे यांच्यासह पुणे आणि परिसरातील पैलवान मोठ्या संख्यने उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या-
-‘आगामी काळात विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम होणार’; सुप्रिया सुळेंची इंदापुरातली सभा तुफान गाजली
-आढळराव पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार; नीलम गोऱ्हे म्हणाल्या, ‘त्यांनी आत्पधर्म म्हणून..’
-मावळात महायुतीचा तिढा काही सुटेना; बारणेंना विरोध, भेगडेंनंतर आता जगताप यांच्या उमेदवारीची मागणी
-आढळराव पाटलांच ठरलं! 26 तारखेला होणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
-Baramati Lok Sabha Election | शिवतारेंचं ठरलं; अजित पवारांच्या ‘या’ कट्टर विरोधकाची घेणार भेट