पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देशातील लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्यातील सर्व मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. निवडणुकीच्या काळात होणाऱ्या पैशांच्या गैरवापरावर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यावर अंकुश ठेवण्यासाठी पुणे प्राप्तिकर विभागाने तास करडी नजर ठेवत २४x७ कार्यरत असणारा नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.
प्रत्येक नागरिक त्यांच्या तक्रारी किंवा फोन कॉल, व्हॉट्सॲप किंवा ईमेलद्वारे नोंदवून या नियंत्रण कक्षाकडे करु शकतात. किंवा पैशांच्या गैरवापराची माहिती देऊ शकतात. लोकसभा निवडणूक २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया देशभरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पुणे प्राप्तिकर विभागाने निवडणुकांच्या काळात होणाऱ्या पैशांच्या गैरवापरावर करडी नजर ठेवण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक विशेष नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.
नियंत्रण कक्ष २४ तास आठवड्याचे सातही दिवस कार्यरत असेल. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी २०२४ च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये होणाऱ्या पैशांच्या गैरवापराशी संबंधित माहिती अथवा तक्रारी नोंदविता येतील.
तक्रार येथे नोंदवा…
टोल फ्री क्रमांक – १८००-२३३-०३५३
टोल फ्री क्रमांक – १८००-२३३-०३५४
व्हॉट्सॲप क्रमांक- ९४२०२४४९८४
ईमेल आयडी – [email protected]
नियंत्रण कक्षाचा पत्ता – खोली क्रमांक ८२९, आठवा मजला, आयकर सदन, बोधी टॉवर, सॅलिसबरी पार्क, गुलटेकडी, पुणे ४११०३७
महत्वाच्या बातम्या-
-उमेदवारी डावलली अन् वरिष्ठांनी समजूत काढली, तरीही मुळीकांची नाराजी कायम; मतदारसंघातील बैठकीला दांडी
-“पुण्यातल्या भिंतीवरची ‘कमळ‘ पुसा, नाहीतर आयोगाला ‘हाताचा पंजा‘ भेट देऊ”
-“जेव्हा मी पुणे लोकसभेच्या रिंगणात उतरेल त्यावेळेस खऱ्या अर्थाने रंगत येईल”- वसंत मोरे
-लागा कामाला! आढळरावांना अजित पवारांची सूचना; शिरूरमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला?
-“फडणवीस कधीच चुकीचा पत्ता टाकत नाहीत, त्यांनी जाहीर केलेला उमेदवार निश्चित विजयी होतील”