पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसकडून उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर प्रचाराने वेग पकडला आहे. महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. यावेळी बोलताना “मुरलीधर मोहोळ हे रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होतील. त्यांना घरातूनच पैलवानकीचा वारसा मिळाला आहे. पैलवान असल्याने कुठला डाव टाकायचे हे त्यांना माहीत आहे. स्वार्थासाठी राजकीय आखाडे बदलणारा त्यांच्यापुढे टिकणार नाही” असं शिंदे यांनी म्हटलं आहे.
मुरलीधर मोहोळ यांना दिवंगत खासदार गिरीश बापट यांचा वारसा पुढे चालवायचा आहे. विधानसभेत अडचण येईल तेंव्हा एका मोठ्या भावाप्रमाणे गिरीशभाऊ मार्गदर्शन करायचे. पुण्याच्या विकासासाठी ते सातत्याने काम करायचे. त्यांचाच वारसा घेऊन पुण्यातून मोहोळ हे दिल्लीत जातील. बूथवरील कार्यकर्ता ते खासदारकीचा उमेदवार, असा मोहोळ यांचा प्रवास आहे. मोदींनी देखील बुथच्या स्तरावरील कार्यकर्त्यांच्या कामाचं कौतूक केलं आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
दरम्यान, मुरलीधर मोहोळ हे कोरोनाच्या काळामध्ये रस्त्यावर काम करत होते, परंतु राज्यांमध्ये काही लोक केवळ फेसबुक लाईव्ह करत राहिले. आज तेच नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहेत, परंतु मोदींनी वक्रदृष्टी केली तर फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांना फेस येईल. कोरोनाच्या काळात आमच्यासारखे लोक रस्त्यावर काम करत असताना काही लोक दवाखाना, ऑक्सिजन प्लांट यामध्ये भ्रष्टाचार करत होते, असे म्हणत मुरलीधर मोहोळ यांच्या कोरोना काळातील कामाचे कौतुक करतानाच एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Summer Skin Care Tips: वाढत्या उन्हामुळे त्वचेवर टॅनिग झालंय! करा ‘हे’ घरगुती उपाय
-मतदार जागृतीच्या बोर्डावर ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘नोटा’; एबीव्हीपीकडून आंदोलनाचा इशारा