पुणे : येत्या लोकसभा निवडणुकीत मराठा व्होट बँकेची ताकद दाखवून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवा, असा आदेश मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना दिला होता. या निवडणुकीतून मराठा लोकांच्या मतदानाची ताकद दाखवून द्या, असंही मनोज जरांगे म्हणाले होते.
प्रत्येक जिल्ह्यात मराठा आंदोलक एका उमेदवाराला रिंगणात उतरवणार, ही चर्चा सुरु असतानाच पुण्यातील काहीच दिवसांपूर्वी मनसेला राम राम ठोकलेले वसंत मोरेंनी मराठा समाजाच्या बैठकीला उपस्थिती लावली होती. मराठा समाजाच्या या या बैठकीत काही कारणावरुन गोंधळ पाहायला मिळाला. ही बैठक होताच वसंत मोरे तडकाफडकी निघून गेल्याचं चित्र पहायला मिळालं.
वसंत मोरेंनी मराठा समाजाच्या बैठकीला उपस्थिती लावल्याने वसंत मोरे हे पुणे लोकसभा निवडणुकीसाठी मराठा समाजाचा उमेदवार म्हणून निवडणूक लढणार असल्याच्या चर्चेने जोर धरला. त्यामुळे पत्रकारांनी वसंत मोरेंना घेरलं आणि त्यांना पुण्यातून मराठा समाजाचे उमेदवार तुम्ही असणार का?, असा प्रश्न विचारला. त्यावेळी मात्र बैठकीमधील बाकी कार्यकर्त्यांनी वसंत मोरे यांना हटकलं आणि वसंत मोरेंना विचारलेल्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा प्रयत्न केला. हे सगळं पाहून वसंत मोरे चिडले आणि तडकाफडकी निघून गेल्याचं पहायला मिळालं.
महत्वाच्या बातम्या-
-Pune Lok Sabha | मोहोळांची ताकद वाढली! मुरलीधर मोहोळांच्या पाठिशी आता संजय काकडेंचेही बळ
-बारामतीच्या राजकारणात मोठी घडामोड; सुप्रिया सुळे-सुनेत्रा पवार पुन्हा येणार एकत्र!
-उद्धव ठाकरेंनी जाहीर केली १७ उमेदवारांची यादी, कुणा-कुणाला संधी?
-पुणे लोकसभेत वसंत मोरेंचा वेगळा प्रयोग?? मराठा समाजाचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात?