पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीचे पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. निवडणूक अर्ज दाखल केल्यानंतर मोहोळ यांच्या प्रचारासाठी नदीपात्रात सभा होणार आहे. शहरातील ओंकारेश्वर मंदिराजवळील जागेत सभा घेण्याचे नियोजन केले आहे. या सभेसाठी नदीपात्रातील जागेची चाचपणी सुरू झाली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खडकवासला येथील निवडणूक कार्यालाच्या उद्घाटनप्रसंगी नदीपात्रात सभा होणार असल्याचे जाहीर केले आहे. मुरलीधर मोहोळ यांच्या निवडणूक अर्ज दाखल केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयापासून रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीचा समारोप नदीपात्रात करण्यात येणार असून, तेथे ही सभा घेण्यात येईल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह महायुतीचे अन्य पदाधिकारी या सभेला उपस्थित राहणार आहेत. तसेच महायुतीच्या बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार, शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि मावळचे उमेदवार श्रीरंग बारणे या सभेला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-रविवार पेठेतील भोरी आळीमध्ये दुकानाला आग; सुदैवाने कोणतीही जिवीत हानी नाही
-निवडणुकीनंतर पवार कुटुंब एकत्र येणार?; अजितदादा म्हणाले, “एकदा ७ तारखेला मतदान होऊ द्या, मग…”
-लग्नानंतर पती गे असल्याचं समजलं; तरीही २ वर्षे संसार रेटला, अखेर पीडितेने पोलिसांत घेतली धाव
-“निवडणुकीत काहीही करून जिंकण्यासाठी काँग्रेसचे षडयंत्र”, धीरज घाटेंची सडकून टीका