पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान १३ मे रोजी (सोमवारी) होणार आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी सांयकाळी सर्व राजकीय पक्षांच्या प्रचारतोफा थंडावल्या आहेत. चौथ्या टप्प्यातील निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात महायुतीच्या उमेदवारांनी जोरदार प्रचार केला. पुणे लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि शिरुरचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटीलय यांच्या महाविजय जवळपास निश्चित झाल्याचं प्रचारातून स्पष्ट दिसून आले. त्यातच मावळचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि शिवसेना ठाकरे गटाचे संजोग वाघेरे यांच्यात चुरशीची लढत होत असल्याचे चित्र पहायला मिळाले आहे.
चौथ्या टप्प्यातील या निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावल्या असल्या तरी हाती असलेल्या शेवटच्या दिवशी घरोघरी जात प्रचार करण्यावर कार्यकर्त्यंनी भर दिला आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पुणे शहरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील सभा पार पडली. राज ठाकरेंच्या सभेला तुफान गर्दी झाली होती. राज ठाकरेंनी पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यापुढे पुण्याच्या विकासाचा रोडमॅप सादर केला आणि समोर जमलेल्या लाखोंच्या गर्दीला महायुतीला मतदान करण्याचे आवाहन केले.
राज ठाकरेंच्या या सभेचे पडसाद शिरूर मतदारसंघावरही चांगलेच उमटल्याचे पहायला मिळाले आहेत. कारण पुणे शहरातील हडपसर, कोंढवा आणि कात्रजचा काही भाग शिरूर मतदारसंघात येतो त्यामुळे राज ठाकरे यांचे हे आवाहन तेथील महायुतीच्या मतदारांवर राज ठाकरेंच्या सभेचा प्रभाव पडला असणार. या शेवटच्या टप्प्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभाही चांगल्याच गाजल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘आम्ही घर, पक्ष फोडत नाही, पण संधी मिळाली तर ती सोडत नाही’- देवेंद्र फडणवीस
-Pune | पुणेकरांनो, दाखवा वोट केलेलं बोट अन् मिळवा सूट; स्विगीची भन्नाट ऑफर
-राज ठाकरेंचा फतवा अन् पुण्यात वातावरण पेटले! सोशल मीडियावर “आमचं ठरलंय”चा ट्रेंड; फायदा कुणाला?
-‘मी चुकलो, मला माफ करा, पण आता ती चूक…’; भर पावसात का मागितली अजितदादांनी माफी?
-‘पुण्याला सर्वोत्कृष्ट शहर बणवणार, मतदारांचा मतरूपी आशीर्वाद मला मिळेल’; मोहोळांचा विश्वास