पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ महायुतीची पुण्यातील सारसबाग येथे जाहीर सभा पार पडली. या सभेसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अभिनेता प्रवीण तरडे यांनी हजेरी लावली होती. यावेळी प्रवीण तरडेंनी देखील मोहोळांची सभा चांगलीच गाजवल्याचे पहायला मिळाले.
‘कोणीतरी पुण्याचा रंग बदलण्याचा प्रयत्न करत आहे. मुळशीचा सुपुत्र म्हणून मी आवाहन करतो खंबीर नेतृत्व पुण्याला द्या. परिस्थिती बिकट, हिंदू तेवढाच तिखट. मैत्रीचा पॅटर्न असाच चालू राहील. सालस, सुज्जन, सुशिक्षित नेतृत्व आपल्याला हवं, असे म्हणत मुरलीधर मोहोळ यांना मतदान करण्याचे आवाहन प्रवीण तरडेंनी पुण्याच्या मतदारांना केले आहे.
काय म्हणाले प्रवीण तरडे?
“नेमकी ही धडधड माझ्याच वाट्याला आली. ज्यांच्या वाणीवर सरस्वतीचं वरदान आहे त्यांच्यासमोर आज बोलावं लागतंय. मी माझ्या मित्रासाठी इथे आलो आहे. मुरलीधर मोहोळ माझा मित्र आहे. आणि एवढचं सांगेल दोस्तीचा हा पॅटर्न आम्हाला सर्वदूर पोहोचवायचा आहे. सालस, सज्जन आणि सुशिक्षित नेतृत्व आपल्याला मिळतंय. माझ्या चित्रपटातला एक डायलॉग घेऊन मी एवढच म्हणेल, दोन-दोन वर्षे पाऊस नाही पडला स्वराज्यात तरी थंडीच्या तवावर ज्वारी-बाजरी काढणारी जात आहे आपली…परिस्थिती जेवढी बिकट, हिंदू तेवढाच तिखट.. हा डायलॉग बोलायची या व्यासपीठावर गरज पडली. कारण कोणीतरी पुण्याचा रंग बदलण्याचा प्रयत्न करतोय. पण पुण्याचा रंग इतक्या सहजासहजी बदलू शकत नाही. इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या बापज्यादाने स्वराज्यासाठी या पुण्यात रक्त सांडलेलं आहे”
महत्वाच्या बातम्या-
-“फ्लॉप ठरलेल्या कलाकाराला पुन्हा संधी द्यायची नाही…” फडणवीसांचा कोल्हेंवर प्रहार
-पुण्यासह राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट; पुढचे ४ दिवस वीजांच्या कडाकडासह पावसाची शक्यता
-‘मतदान करा अन् निम्म्या किमतीत खा ‘पॉट आईस्क्रिम’; पुण्यात मतदान जनजागृतीसाठी अनोखी शक्कल
-Pune Lok Sabha | शहरातील गुंडांची झाडाझडती; मतदाच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेची महत्वाची पाऊले
-“शरद पवारांनी राज्यात जातीपातीचं विष कालवलं पण, अजित पवारांना याबाबतीत…”-राज ठाकरे