पुणे : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान उद्या सोमवारी १३ मे रोजी पार पडणार आहे. पुण्यासह राज्यातील ११ ठिकाणी उद्या मतदान होणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाकडून आवश्यक ती सगळी तयारी करण्यात आली आहे. राज्यात व्हीव्हीपॅट मशीन तर अनेक ठिकाणच्या मतदान केंद्रावर बॅलेट युनिट पद्धतीने मतदान करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. एकट्या पुण्यासाठी ६ हजार ०५४ बॅलेट युनिट उपलब्ध करण्यात आले आहेत.
राज्यातील पुणे, मावळ, शिरुर, औरंगाबाद, नंदुरबार, रावेर, जालना, बीड, जळगाव, अहमदनगर आणि शिर्डी या ११ मतदारसंघांमध्ये उद्या मतदान होणार आहे. त्यासाठी २९ हजार २८४ मतदान केंद्र उपलब्ध करण्यात आले असून या मतदान केंद्रांसाठी एकूण ५३ हजार ९५९ बॅलेट युनिट, २३ हजार २८४ कंट्रोल युनिट आणि २३ हजार व्हीव्हीपॅट मशीन उपलब्ध करुन देण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.
मतदान सुरळित पार पडण्यासाठी, मतदान प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये म्हणून मतदान केंद्रांवर नियुक्त केलेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहेत. ईव्हीएममध्ये काही तांत्रिक अडचण आल्यास मशीनचा राखीव कोटा देखील मतदान केंद्रावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात उद्या होणार मतदान, निवडणूक आयोगाची जय्यत तयारी! पुणेकरांनो मतदान नक्की करा
-पुण्यात उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; बेकायदा दारु विक्री प्रकरणी ८३३ गुन्हे दाखल
-‘बजरंगी भाईजान’ची मुन्नी ‘हिरामंडी’मधली आलमजेब; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
-Mother’s Day : संजय दत्त ‘मदर्स डे’च्या दिवशी भावूक; आईची ‘ती’ इच्छा अधुरी राहिल्याची आजही खंत
-पुणेकरांना पाणी कपात; बारामतीला मात्र नियोजनापेक्षा जास्त पाणी