पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बालेकिल्ला मानला जाणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्ये खासदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीने चांगलाच सुरुंग लावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह २० माजी नगरसेवक आणि अनेक पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशाने अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला त्यांच्याच बालेकिल्ल्यामध्ये मोठं खिंडार पडलं आहे. ४ पदाधिकाऱ्यांसह २४ जणांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये या २४ जणांनी अजित पवारांची साथ सोडून तुतारी हाती घेतली आहे. पक्षप्रवेश केलेल्या सर्व नेते, पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी आपले राजीनामे खासदार सुनील तटकरे यांच्याकडे सोपवले होते.
#WATCH | Maharashtra: Several Ajit Pawar-led NCP leaders and Corporators from Pimpri Chinchwad join Sharad Pawar-led NCP-SCP at his residence in Pune.
NCP’s Pimpri-Chinchwad unit chief, Ajit Gavhane is also among the leaders who joined the party here. Three other senior leaders… pic.twitter.com/s71oyZl62w
— ANI (@ANI) July 17, 2024
आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांनी सोडलेली साथ अजित पवारांना मोठा धक्का मानला जात आहे. तर काल राजीनामे दिलेले पदाधिकारी आज शरद पवार गटात पक्षप्रवेश केला आहे. अजित गव्हाणे यांनी आपल्या समर्थकांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आज प्रवेश झाला आहे. पुण्यातील मोदी बागेत शरद पवार यांच्या उपस्थितीत या सर्वांनी प्रवेश केला आहे. ज्येष्ठ नेते आझम पानसरे, शहराध्यक्ष तुषार कामठे आदीसह १५ ते १६ नगरसेवक यावेळी उपस्थित होते. माजी आमदार विलास लांडे देखील उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या-
-विठु माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मुर्ती विठ्ठलाची; आषाढी एकादशीचे महत्व तुम्हाला माहिती आहे का?
-पुण्यात चाललंय तरी काय? दोन अल्पवयीन मुली दारु पिल्या, झिंगल्या अन् दारुच्या नशेत…
-विठूरायाच्या पंढरीत ‘बीव्हीजी’ची स्वच्छता सेवा; बीव्हीजीचे ४०० स्वच्छता दूत सज्ज
-ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकर मैदानात; केल्या ‘या’ प्रमुख ६ मागण्या
-एकदा संधी द्या! आमदार होऊनच दाखवतो, काँग्रेसच्या आबा बागुलांनी घेतली शरद पवारांची भेट