पुणे : माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्वाचे शहर म्हणून पुण्याकडे पाहिले आहे. पुणे शहरामध्ये अनेक माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या आहेत. आता जागतिक स्तरावरील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टने पुन्हा पुणे शहरात जमीन घेतली आहे. आता मायक्रोसॉफ्टने पुण्यातील हिंजेवाडीत १६.४ एकर जमीन घेतली होती. ५२० कोटींत हा सौदा झाला आहे. ही जमीन इंडो ग्लोबल इन्फोटेक सिटी एलएलपीने मायक्रोसॉफ्टला विकल्याचे समोर आले आहे.
पुण्यात घेतलेल्या या जमिनीचा व्यवहार हा ऑगस्ट महिन्यात झाला होता. त्यासाठी ६ सप्टेंबर रोजी झालेल्या ३१.१८ कोटी रुपये नोंदणी शुल्क भरले आहे. २०२४ च्या सुरुवातीला, मायक्रोसॉफ्टचे भारतातील प्रमुख कौशल पहल म्हणाले होते की, त्यांचा उद्देश २०२५ पर्यंत २ दशलक्ष लोकांना आर्टिफिशल इंटेलिजेन्स आणि डिजिटल कौशल्ये शिकवण्याचे आहे. त्यामुळे कंपनीची भारतातील रणनीती तेव्हाच स्पष्ट झाली.
मायक्रोसॉफ्ट इंडियाचा पुण्यातील हा दुसरा मोठा जमीनीचा करार आहे. यापूर्वी कंपनीने येथे २५ एकरचा भूखंड ३२८ कोटी रुपयांना खरेदी केला होता. गेल्या ३ वर्षांत मायक्रोसॉफ्टने एकूण ८४८ कोटींची जमीन खरेदी केली आहे. यापूर्वी २०२२ मध्ये पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये ३२८ कोटींत २५ एकर जमीन घेतली होती. मायक्रोसॉफ्टने फिनोलेक्स इंडस्ट्रीजकडून ही जमीन घेतली होती.
महत्वाच्या बातम्या-
-पुणेकरांना ‘वंदे भारत’ची पुन्हा प्रतिक्षा करावी लागणार; नेमकं कारण काय?
-‘दिलीप मोहितेंना आमदार करा, लगेच लाल दिव्याची गाडी देतो’; अजित पवारांच्या वक्तव्यावरुन खळबळ
-जया किशोरी यांच्या हस्ते श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची आरती
-गणरायाचे दर्शन अन् विधानसभेची साखरपेरणी, श्रीनाथ भिमाले थेट पोहचले ‘सागर’ बंगल्यावर
-अजित पवारांच्या मेळाव्याला आढळराव पाटलांची दांडी; पुन्हा शिंदेंच्या शिवसेनेत जाणार?