पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाक वस्ती परिसरामध्ये रस्त्यालगतचे होर्डिंग कोसळल्याची काल शनिवारी दुर्घटना घडली. यामध्ये कोणतीही जीवीत हानी झाली नसली तरीही एक घोडा यामध्ये जखमी झाला आहे. कोणतीही परवानगी न घेता तसेच स्ट्रक्चरल ऑडीट न करता लावलेले होर्डिंग कोसळल्या प्रकरणी जागामालकासह होर्डिंग कंपनी मालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जागा मालक शरद ज्ञानेश्वर कामठे (रा. लोणी काळभोर), होर्डिंग उभारणारे सम्राट ग्रुपचे संजय संभाजी नवले ( रा. खराडी पुणे) व बाळासाहेब बबन शिंदे (रा. डेक्कन, पुणे) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुलमोहर लॉन्स समोरील पार्कीगलगत असलेले अंदाजे ४० बाय ४० फूट लांबी रुंदीचे लोखंडी सांगाडा असलेले, त्यावर जाहीरातीचे होर्डीग लावलेले लोखंडी सांगाड्याचे होर्डिंग अर्ध्यातुन तुटून गुलमोहर पार्कींगमधील जागेवर पडलेले होते. गुलमोहर लॉन्समध्ये लग्नाचा कार्यक्रमासाठी आलेलल्या प्रभात बॅड कंपनीची महींद्रा पिकअप जीप आणि एक टीव्हीएस ज्युपीटर स्कुटर या होर्डीग खाली दबल्या गेल्या होत्या.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटना कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाक्याजवळ असलेल्या गुलमोहर लॉन्स मंगल कार्यालय येथे शनिवार (१८ मे) रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या दुर्घटनेत मंगेश लक्ष्मण लोंढे, अक्षय सुरेश कोरवी आणि भारत शंकर साबळे हे ३ जण जखमी झाले आहेत. तर एका घोड्याला किरकोळ मार लागला आहे. मात्र, या घटनेत गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार अजिंक्य जोजारे यांनी फिर्यादी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-…अन्यथा बैलगाडा शर्यतीत भाग घेता येणार नाही; बैलगाडा शर्यती संदर्भात नवीन नियमावली जाहीर
-Kangna Ranaut : ‘…तर मी बॉलिवूड क्षेत्र सोडून देणार’; कंगना रणौतचा मोठा निर्णय
-Entertainment : नवाजुद्दीन सिद्दीकीला आवडते ‘ही’ देशी दारु; किंमत ऐकून व्हाल थक्क
-सुप्रिया सुळेंच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; ‘गुलाल आपलाच’ म्हणत ठिकठिकाणी बॅनर
-Baramati News : बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार भिडणार? काय आहे राजकीय परिस्थिती