पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर भागामध्ये झालेल्या अपघातामधील मुख्य अल्पवयीन आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला त्यामुळे अल्पवयीन आरोपीची बालसुधारणा गृहामधून देखील सुटका झाली आहे. त्यातच आता अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांनी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
अग्रवालवर दाखल असलेल्या ३ पैकी २ गुन्ह्यात त्यांना जामीन मंजूर झाल्याने त्याची तुरुंगातून सुटका होणार होती. मात्र, आणखी एका गुन्ह्यात कोठडीत असल्याने आरोपी विशाल अग्रवालचा मुक्काम अद्यापही तुरुंगातच असणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवालचा बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अग्रवालच्या ड्रायव्हर गंगारामला डांबून ठेवल्याप्रकरणी अग्रवाल पिता-पुत्रावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, विशाल अग्रवालवर ससून रुग्णालयातील डॉक्टरांना हाताशी धरुन अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्याचा आणखी एक गुन्हा नोंद आहे. त्या प्रकरणात विशाल आणि शिवानी अग्रवाल हे पती पत्नी येरवडा कारागृहात आहेत. त्यामुळे विशाल अग्रवालची येरवडा कारागृहातून लगेच सुटका होणे शक्य नाही.
महत्वाच्या बातम्या-
-मोठी बातमी: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’त मोठे बदल; शिंदेंची विधानसभेत घोषणा
-अंबादास दानवे जनतेच्या न्यायालयात जाणार; प्रवीण दरेकर म्हणाले, ‘महिलांच्या चपला खायच्या असतील तर…’
-अंबादास दानवेंची सभागृहात शिवीगाळ, उद्धव ठाकरेंनी मागितली माफी; ‘मी आई-बहिणींची माफी मागतो, पण…’
-लोणावळ्यातील दुर्घटनेनंतर मुख्यमंंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश; नवी नियमावली केली जारी