पुणे : पुणे शहरात कल्याणीनगर अपघात प्रकरणाला खूपच वेगळे वळण लागले आहे. अपघात प्रकरणातील आरोपी अल्पवयीन बिल्डर पुत्राचे ब्लड रिपोर्ट बदल्यामुळे ससून रुग्णालयामधील फॉरेन्सीक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर या २ डॉक्टरांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. तसेच या दोन्ही डॉक्टरांची चौकशी सुरु आहे.
डॉक्टरांवर कारवाई सुरु असताना डॉ. अजय तावरे यांनी ‘मी आता शांत बसणार नाही. सगळ्यांची नावे उघड करेन’, पोलिसांना सांगितले आहे. डॉ. तावरे यांच्या या इशाऱ्यानंतर पुण्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात जे कोणी सामिल आहेत त्या सर्वांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
डॉ. तावरे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी अतुल घटकांबळे नावाच्या या व्यक्तीला अटक केली आहे. घटकांबळे या व्यक्तीनेच या डॉक्टरला पैसे पुरवल्याचे देखील समोर आले आहे. डॉ. तावरेंनी या प्रकरणात एका लोकप्रतिनिधीचेही नाव घेतले असून पोलिसांकडून त्याबाबतचा तपास सुरू करण्यात आला आहे.
अल्पवयीन आरोपी हा शहरातील मोठ्या बिल्डर विशाल अग्रवालचा मुलगा असल्याने त्याला या प्रकरणातून वाचवण्यासाठी अनेकांकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. तसेच अनेक बाबी पोलिसांच्या तपासात समोर आल्या आहेत. घटनेनंतर सुरवातीला पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस आणि प्रत्यक्षदर्शींना ‘मॅनेज’ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर ससून रुग्णालयातील डॉक्टरांना पैसे देऊन थेट रक्ताचे नमुने बदलून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कल्याणीनगर अपघातप्रकरणी पोलिसांकडून तपास अधिक वेगाने करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘…तर मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांचा ताबडतोब राजीनामा घ्यावा’; अंजली दमानियांची मागणी
-धक्कादायक! पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात ७५० ग्रॅम गांजा; काय आहे नेमका हा प्रकार?
-Pune Hit & Run | ‘रवींद्र धंगेकरांनी माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर…’; हसन मुश्रीफ यांचा इशारा
-पुण्यात कोणत्या पबला किती हप्ता? अंधारे अन् धंगेकरांनी यादीच वाचून दाखवली; नेमकं काय घडलं?
-Pune Hit & Run: “‘त्या’ रात्री अनेकांनी आपले ईमान विकले, आता हळू हळू जगासमोर येईल”