पुणे : पुणे शहरात पोर्शे कार अपघाताच्या प्रकरणात दररोज नवनविन खुलासे होत आहेत. या अपघात प्रकरणावरुन आता राज्याच्या राजकारणात मोठा वाद उभा राहिला आहे. हा अपघात १९ मे रोजी मध्यरात्री झाला आहे. या अपघातामध्ये कार चालवणारा अल्पवयीन आरोपी त्यावेळी मद्यधुंद अवस्थेत होता. मात्र पोलिसांनी त्याचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाला पाठवले असता ससूनने वेगळाच अहवाल दिल्याच्या आरोपावरुन पुणे शहर गुन्हे शाखेने ससून रुग्णालयातील २ डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे.
‘ससूनसारख्या सरकारी दवाखान्यात हसन मुश्रीफ यांनी लाडावलेली पिलावळ बसली आहे. ही पिलावळ मुश्रीफांच्याच आशीर्वादाने काम करत आहे. मला वाटतं अपघात ज्या दिवशी झाला त्या रात्री या तावरेला नेमका कोणाचा फोन आला होता याची चौकशी झाली पाहिजे आणि हसन मुश्रीफ यांनी राजीनामा दिला पाहिजे’, असे म्हणत काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी मागणी केली. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘या खात्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांचे डोळे अजून उघडलेले नाहीत. डॉ. तावरेसारख्या लोकांना त्या खुर्चीवर बसवण्याचा प्रताप हसन मुश्रीफ यांनीच केला आहे. जर हसन मुश्रीफच असं वागत असतील तर आपण चांगल्या कारभाराची अपेक्षा तरी कशी करणार? मुळात हे सरकारच घोटाळेबाज आहे’, असेही रवींद्र धंगेकर म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात कोणत्या पबला किती हप्ता? अंधारे अन् धंगेकरांनी यादीच वाचून दाखवली; नेमकं काय घडलं?
-Pune Hit & Run: “‘त्या’ रात्री अनेकांनी आपले ईमान विकले, आता हळू हळू जगासमोर येईल”
-“दादागिरीने राजकारण होत नाही, नाहीतर अरुण गवळी मुख्यमंत्री झाले असते”