पुणे : पुणे हिट अँड रन प्रकरणातील महत्वाची बातमी आता समोर आली आहे. पोर्शे कार अपघात प्रकरणातील बिल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. या बदल्यात ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोरला तीन लाखांची लाच घेऊन सॅम्पल कचऱ्यात फेकल्याने अटक करण्यात आली होती. रक्ताचे सॅम्पल बदलण्यासाठी डॉ. श्रीहरी हळनोरला अशपाक मकानदार आणि अमर गायकवाड या दोघांनी ३ लाख रुपये बाल हक्क न्यायमंडळाच्या आवारात दिले होते. अशपाक मकानदार याला आणखी ३ दिवस पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी पोलिसांनी केली आहे.
विशाल अग्रवालकडून मकानदारला ४ लाख रुपये देण्यात आले होते. त्यापैकी ३ लाख रुपये पोलिसांना मिळाले असून, १ लाख रुपये कोठे आहेत? याचा तपास कराण्यासाठी अशपाकला ३ दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ज्या वेळी या फेरफार प्रकरणाबद्दल यांच्यामध्ये बोलणी मिटिंग झाली, त्यावेळी आणखी काही लोक उपस्थित असल्याचा पोलिसांना संशय आहे. याचाच तपास करण्यासाठी ३ दिवस पोलीस कोठडी वाढवून मिळावी, अशी मागणी पोलिसांनी केली आहे.
हे प्रकरण झाल्यानंतर ससून रुग्णालय, येरवडा पोलीस स्थानक, बाल न्यायमंडळ, या सर्व ठिकाणी अशपाक मकानदार याचा वावर दिसून आला आहे. याबाबत देखील तपास करायचा असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. शिवानी अग्रवाल, विशाल अग्रवाल, अशपाक मकानदार यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी आहे. अल्पवयीन आरोपीच्या आई वडिलांची रवानगी आता येरवडा जेलमध्ये होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-कांद्याने महायुतीला रडवले! अजित पवारांनी थेटच सांगितलं कुठे गणित चुकलं
-संघाच्या मुखपत्रातून अजित पवारांवर टीका; अजित पवार म्हणाले, ‘लोकशाहीत…’
-पावसाळ्यात दूध पित आहात? होऊ शकते नुकसान, वाचा काय परिणाम होतात?
-सुषमा अंधारे यांनी दिलेल्या ऑफरवर रुपाली ठोंबरे म्हणाल्या, ‘त्या माझ्या मैत्रीण…’
-जगताप दीर भावजईच्या वादात भाजपच्या निष्ठावंताने घेतली उडी; केला ‘हा’ गंभीर आरोप