पुणे : शहारातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातानंतर शहरातील वातावरण बिघडले आहेत. या अपघातानंतर हा खटला पुणे सत्र न्यायालयामध्ये सुरु आहे. मुख्य आरोपी हा अल्पवयीन असल्याने त्याला बालसुधार गृहामध्ये ठेवण्यात आले असून त्याचे वडिल प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल यांना ३ दिवसांची (२४ मे पर्यंत) पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये आता बिल्डर आणि त्याच्या मुलाला वाचवण्यासाठी त्यांच्या वकिलाने भलताच युक्तीवाद केल्याचे समोर आले आहे.
‘बिघाड असतानाही पोर्शे कार विशाल अग्रवालने मुलाला चालवायला परवानगी दिली’, असा जबाब चालकाने पोलिसांना दिल्याचे सर्वांसमोर आले. पण यानंतर एखादी बिघडलेली कार वडिल आपल्या मुलाला कसे देतील?, असा प्रश्न कोणत्याही सुज्ञान व्यक्तीला पडेल. त्यामुळेच पुण्यातील कल्याणीनगरमध्ये २ जणांचा जीव घेणाऱ्या मुलाला वाचवण्यासाठी हा नवा कांगावा तर नाही ना अशी शंका उपस्थित होत आहे.
विशाल अग्रवाल यांना पुणे सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आले आहे. अग्रवाल यांच्याकडून त्यांचे वकील प्रशांत पाटील युक्तीवाद केला आहे. अग्रवाल यांचा बचाव करताना आलिशान पॉर्शे कारमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचा युक्तिवाद करण्यात आला होता. ‘अपघातापूर्वीत कारमध्ये बिघाड असल्याचे विशाल अग्रवाल यांच्या निदर्शनास आले होते. या बिघाडासंदर्भात त्यांनी कंपनीशी देखील संपर्क साधला होता. मात्र कंपनीने त्यांच्या तक्रारीची दखल न घेतल्याने विशाल अग्रवाल यांनी ग्राहक तक्रार निवाारण आयोगात तक्रार केली होती’, असे वकील प्रशांत पाटील यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-राज्यात लोकसभेचे मतदान होताच अजित पवारांनी बोलावली महत्त्वाची बैठक; नेमकं कारण काय?
‘…म्हणून अजित पवारांना उपमुख्यमंत्री केलं गेलं’; राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठा गौप्यस्फोट
-‘भविष्यात जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर, जागेवर जाऊन…’; वसंत मोरेंचा इशारा
-अडीच कोटींच्या कारसाठी अग्रवालांकडून १७०० रुपयांचा चेंगटेपणा; नेमकं काय प्रकरण?