पुणे : पुणे पोर्शे हिट अँड रन प्रकरणात सखोल तपासणी अद्यापही सुरु आहे. या प्रकरणामध्ये दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. या अपघातामध्ये अनेकांना चौकशीसाठी अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये फेरफार केल्या प्रकरणी ससून रुग्णालयातील २ डॉक्टर तसेच आरोपीच्या आईला देखील अटक केली आहे. या चौकशीदरम्यान या डॉक्टरांना रक्त बदलण्याचा सल्ला कोणी दिला याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अश्फाक मकानदार आणि ससून रुग्णालयातील न्यायवैद्यक शास्त्र विभागाचे अधीक्षक डॉ. अजय तावरे डॉ. तावरे यांनीच रक्त बदलण्याचा सल्ला दिल्याची माहिती समोर येत आहे. मकानदार आणि डॉ. तावरे यांनीच अल्पवयीन मुलाऐवजी आईचे रक्त बदलण्यास सांगितल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. विशाल अग्रवाल आणि मकानदारची एका कॅफेत भेट झाली होती.
‘तुमच्यावर कारवाई होईल’, असा इशारा विशाल अग्रवालला मकानदारने दिला होता. या भेटीनंतर विशाल अग्रवाल हा संभाजीनगर येथे फरार झाला होता. पोलिसांनी त्याला संभाजीनगरमधून अटक केली होती. अल्पवयीन आरोपीच्या रक्त नमुन्यात बदल केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने अश्फाक मकानदार आणि अमर गायकवाड या दोघांना अटक केली आहे. सध्या मकानदार आणि गायकवाड या आर्थिक व्यवहार करणाऱ्या दोघांना १० जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
हत्वाच्या बातम्या-
-Baramati | विजयानंतर सुप्रिया सुळे अजितदादांंच्या निवासस्थानी; म्हणाल्या…
-‘कोकणात जाऊन काही लोक…’; वसंत मोरेंचा मनसेला खोचक टोला
-कोण होणार पुण्याचा आरटीओ? ‘या’ दोघांच्या नावाची होतेय जोरदार चर्चा
-महाराष्ट्रात प्रथमच महिलांच्या हस्ते लाल महालात ३५० वा शिवराज्याभिषेक दीन साजरा
-ठरलं तर! नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी होणार विराजमान