पुणे : पुणे शहरामध्ये बड्या बापाच्या मुलांनी चांगलाच उच्छाद मांडला आहे. कल्याणीनगर पोर्शे अपघात प्रकरण आणखी निवळले नाही तोच पुण्यात जुन्या पुणे-मुंबई महामार्गाजवळ झालेल्या हिट अँड रन प्रकरणाने सगळीकडे पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. एका चारचाकी कारने ड्युटीवर असलेल्या २ पोलिसांना चिरडले. या अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे, तर दुसरा पोलीस कर्मचारी गंभीर जखमी आहे.
दापोडीत हिट अँड रनमध्ये हवालदार समाधान कोळींचा मृत्यू झाला आहे. दापोडीत पोलिसांना धडक देणाऱ्या कारचालकाचे सिद्धार्थ केंगार असे नाव असल्याचे तपासामध्ये उघड झाले आहे. पोलीस कॉन्स्टेबलच्या दुचाकीला धडक देऊन पळालेली गाडी स्वीफ्ट डिझायर कार असून पोलिसांनी कार चालकाला पुण्यातून कारसह ताब्यात घेतले आहे.
तपासात स्विफ्ट कारने धडक दिल्याने पोलिस कॉन्स्टेबल समाधान कोळींचा मृत्यू झाला आहे. सिद्धार्थ केंगार (२४ वर्षे) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी अटकेत असून वाहन पण ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले आहे. आरोपीचे ब्लड घेण्यात आले असून तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-लाडक्या बहिणींसाठी योजना मग लाडक्या दाजींसाठी काय?; अमोल कोल्हेंचा राज्य सरकारला खोचक टोला
-अजित पवारांनी भर सभागृहात सांगितले, ‘भावांना अर्थसंकल्पातून काय-काय मिळालं?’ वाचा सविस्तर..
-Pune Hit & Run: पुण्यात आणखी एक अपघात, २ ऑनड्युटी पोलीस कर्मचाऱ्यांना भरधाव कारने चिरडलं
-अजित पवारांच्या आमदाराचं ठरलंय; ‘विधानसभेसाठी अनेकांकडून संपर्क, मी…’
-‘पुढची निवडणूक बारामतीतून लढणार’; महादेव जानकरांची मोठी घोषणा