पुणे : पुणे कार अपघातामध्ये आणखी धक्कादायक खुलासा झाला आहे. प्रसिद्ध बिल्डर विशाल आगरवालचा मुलगा वेदांत अगरवालने मद्यधुंद अवस्थेत दोघांना चिरडले. या अपघातामध्ये सुशिक्षित दोन तरुणांचा मृत्यू झाला. दारूच्या नशेत गाडी भरधाव वेगाने चालवणाऱ्या अल्पवयीन वेदांत अग्रवालला तुरुंगात रॉयल ट्रीटमेंट मिळाली आणि १५ तासांमध्ये जामीन मंजूर झाला. पण या आधीही त्याच्या आजोबांच्या बाबतीतही पोलिसांनी विशेष प्रयत्न करून त्यांना मदत केल्याचे देखील आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अगरवाल कुटुंबीयांवर पुणे पोलिसांचा आधीपासूनच वरदहस्त असल्याचे समोर आले आहे.
अगरवाल कुटुंबायांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन समोर आले आहे. विशाल अगरवाल यांचे वडील सुरेंद्र कुमार अगरवाल यांचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनशी संबंध असल्याची माहिती उघड झाली आहे. वेदांत अगरवालची हमी देण्यासाठी आलेल्या त्याचे आजोबा सुरेंद्र अगरवालांचे संबंध हे थेट छोटा राजनशी असल्याचं समोर आलं आहे. सन २००७-०८ च्या दरम्यानचे एक प्रकरण समोर आले आहे.
मुंबई सत्र न्यायालयात छोटा राजनशी संबंधित सर्व प्रकरणे सीबीआयकडे हस्तक्षेप करण्यात आली होती. त्यामध्ये सुरेंद्र अगरवाल यांनी छोटा राजनचा हस्तक असलेल्या विजय तांबट याची बँकॉकमध्ये जाऊन भेट घेतली होती. भावासाोबत असलेल्या संपत्तीच्या वादात राजनने आपल्याला मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर अजय भोसले या व्यक्तीच्या खुनाच्या प्रयत्नात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणात पोलिसांनी मोक्का लावणे अपेक्षित असताना फक्त आयपीसी कलम लावण्यात आली होती. तसेच चार्जशीट दाखल होईपर्यंत सुरेंद्र अगरवाल यांना अटकही करण्यात आली नव्हती. नंतर छोटा राजनला भारतात आणल्यानंतर त्याच्याशी संबंधित सर्व प्रकरणे ही सीबीआयकडे ट्रान्सफर करण्यात आली. त्यामध्ये सुरेंद्र अगरवालांचे हे प्रकरण असल्याचे आता उघड झाले आहे. यावरुन अगरवाल कुटुंबावर पुणे पोलिसांचा वरदहस्त असून वेदांतच्यानिमित्ताने हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Pune Hit & Run: गृहमंत्री फडणवीसांचा पोलीस आयुक्तांना फोन; दिले महत्त्वाचे आदेश
-Kalyaninagar Hit & run: अखेर आमदार टिंगरेंनी सोडलं मौन, म्हणाले, “विशाल अगरवालचा फोन आला होता, पण…”