पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगरमध्ये घडलेला अपघात शहरातच नाही तर राज्यात चर्चेचा विषय बनला आहे. या अपघतानंतर आरटीओने महत्वाची पाऊली उचलली आहेत. अलिशान पोर्श कारची तात्पुरती नोंदणी रद्द करण्यात आली आहे. कारची तात्पुरती नोंदणी १८ मार्चला झाली होती. शहरातील आरटीओमध्ये कारच्या नोंदणीसह इतर शुल्क अशी १ हजार ७५८ रुपयांची रक्कम आकारण्यात आली होती. मात्र, अग्रवाल यांनी ही रक्कम न भरल्याने आपल्या अलिशान पोर्श कारची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.
आरटीओकडून या कारची तात्पुरती नोंदणी रद्द झाल्यानंतर तिची पुढील १२ महिने नोंदणी करता येणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे. या नोंदणीची मुदत १७ सप्टेंबरपर्यंत वैध आहे. ही कार पुण्यात आल्यानंतर १८ एप्रिलला नोंदणीसाठी ती पुण्यातील आरटीओमध्ये नेण्यात आली. तिथे आरटीओतील निरीक्षकाने तिची तपासणी केली. तिच्या नोंदणीसह इतर शुल्क अशी १ हजार ७५८ रुपयांची रक्कम अग्रवाल यांच्याकडून भरली न गेल्याने या कारची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.
आता या कारची मालकी असलेल्या ब्रह्मा कंपनीला याबाबत नोटीस बजावली जाणार आहे. कारची तात्पुरती नोंदणी रद्द झाल्यानंतर तिची पुढील १२ महिने नोंदणी करता येणार नाही. वेदांत अग्रवालकडून झालेल्या अपघातामध्ये असलेली कार ही बंगळुरुच्या एका डीलरकडून आणण्यात आली आहे. या कारसाठी बेंगळुरू सेंट्रल आरटीओकडून तात्पुरती नोंदणी करण्यात आली होती.
बंगळुरुमध्ये तात्पुरती केलेली नोंदणी ही १८ मार्च २०२४ ते १७ सप्टेंबर २०२४ पर्यंत वैध होती. १८ एप्रिल २०२४ रोजी मालकाने कार पुण्यात आरटीओमध्ये नोंदणीसाठी आणली होती. येथे कारची तपासणी केली गेली आणि मंजुरीही देण्यात आली. मात्र यासाठी आकारण्यात आलेले शुल्क भरले गेले नाही म्हणून कारसाठी नोंदणी क्रमांक जारी केला गेला नव्हता.
महत्वाच्या बातम्या-
-बाणेर-बालेवाडी भागातील नाईट लाईफला आवर घाला, लहू बालवडकरांची आक्रमक भूमिका; थेट घेतली पोलिसांची भेट
-पिंपरी चिंचवड महापालिका अॅक्शन मोडमध्ये; शहरातील अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई सुरू
-चहाप्रेमींनो, जास्त वेळ उकळलेला चहा पिणं ठरु शकतं घातक; होऊ शकतात गंभीर परिणाम
-‘लोक तुम्हाला का नाकारतात? कारण, तुमचा…; पुणे अपघातावरुन मोहोळ-धंगेकरांच्यात तू-तू मै-मै!
-Pune Hit & Run: विशाल अग्रवालला बेल की जेल? वाचा कोर्टात आज नेमकं काय घडलं?