पुणे : पुण्यात कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्शे अपघाताबाबत सर्व स्तरामध्ये चर्चा होत आहे. या प्रकरणाचे सोशल मीडियावरही चांगलेच या घटनेचे पडसाद उमटले आहेत. या प्रकरणात बड्या बिल्डरच्या बापाच्या मुलाने अलिशान कारने मद्यधुंद अवस्थेत दोघांना चिरडले आणि त्या दोघांचाही मृत्यू झाला आहे. त्यावरुन पालकांनी केलेल्या संस्कारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यावरुन आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीमधील एका कार्यक्रमात सर्व पालकांना काही सवाल केले आहेत.
”पुणे, नागपूर, जळगावमध्ये गेल्या काही दिवसात अपघाताच्या मोठ्या घटना घडल्या. या अपघातांमध्ये आता आपल्या पालकांनी आपली मुले व्यवस्थित राहतात का? रात्री कुठे जातात? काय करतात? याकडे सगळ्याच पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे. डिपार्टमेंट त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी काम करेल. पण, आपला मुलगा चुकणार नाही याची काळजी घ्या”, असे अजित पवारांनी सांगितले आहे.
“आपल्याकडे मुलांचे लाड जास्त करतात. मग केलेल्या लाडाची किंमत मोठी मोजावी लागते, आता अशा घटना घडत आहेत, कोणत्याही परिस्थितीत कायदा, नियम सगळ्यांना सारखा आहे. तो श्रीमंत बापाचा मुलगा असुदे किंवा कुणाचाही मुलगा असुदे. यामध्ये कुणीही चुका केल्या असतील तर सोडले जाणार नाही. कायदा आणि नियम श्रेष्ठ आहे. आपण सर्वांनी काळजी घ्यावी. बारामतीमध्ये काही मुले चुकीची वागत असतील तर लक्षात आणून दिले पाहिजे. आपण सर्वांनी काळजी घेऊया”, असे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे विद्यापीठात सापडलेल्या अंमली पदार्थावर युवासेना आक्रमक; विद्यापीठ प्रशासनाला दिला ‘हा’ इशारा