पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघात प्रकरणी सर्व स्तरातून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवालच्या मुलाने वेदांत अग्रवालने आपल्या अलिशान पोर्शे कारने भरधाव वेगाने दुचाकीस्वाराला धडक दिली. या कारच्या धडकेत अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर राज्यभरात संतप्त पडसाद उमटले होते. या अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या मुलाला १५ तासांत जामीन मिळाला.
पुणे पोलिसांनी आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाला पिझ्झा, बर्गर खाण्यास दिले असल्याचे देखील समोर आले होते. या सगळ्या प्रकरणावर आता अभिनेत्री केतकी चितळेने संताप व्यक्त केला आहे. केतकी चितळे ही नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. केतकी चितळेने पुणे अपघात प्रकरणावर एका व्हिडीओतून आपली भूमिका मांडली आहे. या व्हिडीओत केतकीने पोलिसांवर आपला संताप व्यक्त केला आहे.
View this post on Instagram
२ वर्षापूर्वी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळेला अटक झाली होती. त्यावेळी पोलिसांनी दिलेली वागणूक आणि या अपघात प्रकरणातील आरोपीला दिलेल्या व्हीआयपी ट्रिटमेंटवर तिने संताप व्यक्त केला आहे. केतकी देखील काही महिन्यांपूर्वी कारागृमध्ये होती. त्यावेळी तिला अशी ट्रिटमेंट मिळाली नसल्याचंही तिने व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
View this post on Instagram
‘आपल्यासारखं सामान्य नागरिकांना सोळा-साडे सोळा तास उपाशी ठेवलं जाते. १ किलोमीटर अंतरापर्यंत वडापाव-किंवा भजीपावची गाडीच नाही, त्यामुळे तुझ्यासाठी खायला आणणं शक्य नसल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. तेव्हा सोळा तास मी उपाशी होते आणि आता रात्री ३ वाजता या लाडावलेल्या मुलासाठी पोलीस बर्गर पिझ्झा शोधत होते’, असं म्हणत केतकी चितळेने संताप व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-ओबीसींचे आरक्षण मुस्लिमांना देणाऱ्या ममता बॅनर्जींना कोलकाता न्यायालयाची चपराक; बावनकुळे म्हणाले,…
-कल्याणीनगर अपघाताचा पुणे वाहतूक पोलिसांनी घेतला धसका; शहरात अनेक भागात नाकाबंदी अन्..
-बिल्डरच्या मुलाला वाचवण्यासाठी वकिलांचा नवा कांगावा; युक्तीवादात म्हणाले, ‘गाडी बिघडलेली…’
-राज्यात लोकसभेचे मतदान होताच अजित पवारांनी बोलावली महत्त्वाची बैठक; नेमकं कारण काय?