पुणे : पुणे शहरातील अपघात प्रकरणाने राजकीय वळण घेतल्यानंतर राज्यतील अनेक नेत्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये या प्रकरणातील तपासाची सुत्रे फिरवली आहेत. त्यातच या प्रकरणामध्ये रोज नवे धक्कादायक खुलासे होत आहेत. त्यातच आता काँग्रेसते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केला आहे.
“नागपूर, जळगाव आणि पुण्यात अशा घटना घडल्या. पण अत्यंत संताप आणण्याचा प्रकार म्हणजे यातील गर्भश्रीमंत आरोपींना तातडीने जामीन कसा मिळेल, यासाठी सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून प्रयत्न झाले. दुष्काळाचा प्रश्न गंभीर असताना दुसरीकडे दारू आणि ड्रग्जचे सेवन करुन सर्वसामान्य लोकांना गाडीखाली चिरडण्याचे प्रकार वाढले आहेत”, असे नाना पटोले म्हणाले आहेत.
पुणे अपघात प्रकरणात फडणवीसांची भूमिका संशयास्पद वाटते, मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा. पुणे अपघात प्रकरणात गर्भश्रीमंत व्यक्तींना वाचवण्यासाठी राजकीय हस्तक्षेप झाल्याचे दिसत असल्याने राज्याच्या यंत्रणेवर विश्वास नाही. या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फतच झाली पाहिजे”, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.
‘फडणवीसांनी स्वतःच्या वकीलीचा वापर आरोपींना वाचवण्यासाठी केला. पुण्यात ड्रग्जचा अवैध धंदा जोरात सुरु आहे. पुणे व नागपूर शहरातही अवैध पबने थैमान घातले आहे. या प्रकरणानंतर पुण्यातील ३६ अवैध पब पाडावे लागले. गुजरातमधून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज महाराष्ट्रात आणून तरूण पिढीला बरबाद करण्याचे पाप भाजपने केले आहे’, असा आरोप नाना पटोलेंनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“सुप्रिया सुळेंमुळेच सगळे शरद पवारांना सोडून जात आहेत, मी आणि धीरज शर्मादेखील…”
-“मी त्यांची माफी नाही तर त्यांना दंडवत घालीन त्यांच्या पाया पडेल, पण फक्त…”-रवींद्र धंगेकर
-हिट अँड रन प्रकरण: बिल्डर बाप-लेकाची पोलीस कोठडी वाढवली, कोर्टात आज नेमकं काय घडलं?
-Pune Hit & Run : “अजित पवारांची नार्को टेस्ट करा, त्यांच्या फोनची पूर्ण तपासणी झाली पाहिजे”