पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघाताची चौकशी सध्या सुरु आहे. या प्रकणात अनेक नवे खुसाले होताना दिसत आहेत. मुख्य आरोपी वेदांत अग्रवाल हा बिल्डर विशाल अग्रवालचा मुलगा आहे. तसेच त्याचे आजोबांची देखील चौकशी करण्यात येत आहे. त्यातच आता विशाल अग्रवालच्या अडचणीत आणखी वाढ होणार असल्याचे दिसत आहे. या प्रकरणी विशाल अग्रवाल यांच्यावर आता २ गुन्हे नव्याने दाखल करण्यात येणार आहे.
अपघात प्रकरणातील पुरावा नष्ट केल्याचा आणि खोटी माहिती दिल्याने हे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाला विशाल अग्रवालच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही यापूर्वी जुवेनाईल अॅक्टनुसार ७५ आणि ७७ कायद्याअंतर्गत लहान मुलाच्या हाती गाडी दिल्याचे गुन्हे दाखल केले. मात्र त्यानंतर आता न्यायालयाला खोटी माहिती दिल्याचे देखील समोर आले आहे. त्यावरुन विशाल अग्रवालवर कलम २०१ अंतर्गत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
अल्पवयीन मुलासोबत कारमध्ये असलेल्या ड्रायव्हरला ‘तू कार चालवत होता असं पोलिसांना खोटं सांग’ असे विशाल अग्रवालने ड्रायव्हरला सांगितल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येणार. विशाल अग्रवालवर आर. टी. ओ.च्या तक्रारीनंतर कलम ४२० च्या अंतर्गत दुसरा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. पोर्शे कारची नोंदणी झालेली नसताना नोंद झाल्याची खोटी माहिती दिल्याबद्द्ल गुन्हा दाखल करण्यात येणार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-Health Update : कलिंगड, टरबूज खाल्ल्याने होतेय विषबाधा; खाण्यापूर्वी अशी घ्या काळजी
-दोनदा एफआयआर का? आरोपीला पिझ्झा का? अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली कारणे
-‘हो, त्या रात्री आमदार टिंगरे पोलीस स्टेशनमध्ये आले होते, पण…’; अमितेश कुमार यांनी दिली माहिती
-‘..म्हणून आरोपी वेदांत अग्रवालच्या रक्तचाचणी अहवाल महत्त्वाचा नाही’; अमितेश कुमार असं का म्हणाले?