पुणे : पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून चांगलेच तापमान वाढले आहे. पुणेकर वाढत्या तापमानामुळे हैराण झाले आहेत. यंदाच्या हंगामामध्ये पुण्याचे तापमान सर्वाधित नोंदवले गेले आहे. शहरातील कोरोगाव पार्क भागात तापमानाची नोंद ४३.१ अंश सेल्सिअस अशी करण्यात आली आहे. तापमानात सातत्याने वाढ होत असल्यामुळे पुणेकरांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे. काम नसल्यास दुपारच्या वेळी बाहेर पडू नका, भरपूर पाणी पित रहा, अशा सूचना हवामान खात्याकडून पुणेकरांना देण्यात आल्या आहेत.
पुणे शहरात कोरोगाव पार्क येथे ४३.३ अंश सेल्सिअस, ढमढेरे येथे सर्वाधिक ४३.४ अंश सेल्सिअस, शिरुरमध्ये ४३.१ अंश सेल्सिअस आणि वडगाव येथे ४३ अंश सेल्सिअस तर शिवाजीनगर येथे २८ एप्रिल रोजी ४१. ३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर १८ एप्रिल रोजी शिवाजीनगरमधील तापमान ४२.१ अंश सेल्सिअस होते त्यामध्ये आता वाढ झाली आहे. तर सध्याचे तापमान ३.२ अंश सेल्सिअसने वाढले आहे. आरोग्य विभागाच्या विशेष सूचना जारी केल्या आहेत.
- जेव्हा शक्य असेल तेव्हा पुरेसे पाणी प्या, तुम्हाला तहान लागली नसली तरीही थोड्या वेळाने पाणी प्या
- प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.
- ओरल रीहायड्रेशन सोल्यूशन (ORS) वापरा आणि लिंबू पाणी, ताक, लस्सी आणि फळांचे रस यांसारखे घरगुती पेय प्यावे.
- टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, कोशिंबिर तसेच स्थानिक उपलब्ध फळे आणि भाज्या यासारखी उच्च पाणी सामग्री असलेली
- हंगामी फळे आणि भाज्या खाव्यात.
- पातळ, सैल, सुती आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे घालावे.
- तुमचे डोके झाकून ठेवा, थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असताना छत्री, टोपीचा वापर करा.
- उन्हात बाहेर जाताना शूज किंवा चप्पल घालाव्यात.
- हवेशीर आणि थंड ठिकाणी जास्त वेळ घालवा.
- दिवसा खिडक्या आणि पडदे बंद ठेवावे. थंड हवा येण्यासाठी त्यांना रात्री खिडक्या उघड्या कराव्यात.
भारतीय हवामान विभागानने शहरातील तापमानाची पातळी वाढण्यामागची कारणे सांगितली आहेत. “कोकण, उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात गुजरातमधून उष्ण हवा येत आहे. या भागात यंदा चांगला पाऊस झाला नाही, मान्सूनपूर्व पाऊसही पुरेसा झाला नाही, परिणामी जमीन कोरडी पडली असून ती अधिक तापत आहे. याव्यतिरिक्त, मध्यम अल निनोचा प्रभाव असल्याचं पुणे येथील हवामान आणि अंदाज विभागाचे माजी प्रमुख अनुपम कश्यपी म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-Summer Food : उन्हाळ्यात आरोग्यासाठी ‘हे’ पदार्थ पचायला उत्तम! आजच आहारात करा समावेश!
-“पंतप्रधान मोदींची सभा जय्यत होणार, प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून साधारण ५० हजार लोक सभेला येणार”
-‘…म्हणून आम्ही बारामतीमध्ये उमेदवार दिला नाही’; प्रकाश आंबेडकरांनी सागितलं नेमकं कारण
-पुण्यात मोदींच्या सभा अन् शिरुरमध्ये आढळराव-अमोल कोल्हे एका मंचावर; दोघे एकमेकांच्या पाया पडले
-“केंद्र सरकारने मागील १० वर्षात पुण्यासाठी भरपूर काही दिलंय”- मुरलीधर मोहोळ