पुणे : अनेकांना कुत्रा, मांजर असे पाळीव प्राणी पाळण्याची भारी हौस असते. अशातच आता पुण्यातील एका महिलेला मांजरी पाळणं चांगलंच महागात पडलं आहे. पुण्यातील हडपसर येथील मार्व्हल बाउंटी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये एका महिलेने तब्बल ३५० मांजरी घरात पाळल्याने संपूर्ण सोसायटीमध्ये भीतीचे आणि त्रासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोसायटीमधील नवव्या मजल्यावर तब्बल ५ वर्षांपासून एका ३ बीएचके फ्लॅटमध्ये एका महिलेने तब्बल ३५० मांजरी पाळण्यात आल्या आहेत. या मांजरीची देखभाल करण्यास त्यांनी ५ ते ६ कामगार ठेवले आहेत. इतक्या मोठ्या संख्येने मांजरी ठेवल्यामुळे दुर्गंधी, आवाज आणि स्वच्छतेच्या समस्यांनी रहिवासी हैराण झाले आहे. त्यांनी याबाबतची तक्रार देखील नागरिकांनी केली आहे. मात्र, त्याची दखल घेतली जात नसल्याचे आणि मालक प्रतिसाद देत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
सोसायटीमधील रहिवाशांच्या तक्रारीची दखल न घेतल्याने या नागरिकांनी पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानंतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पण संबधीत व्यक्तीनी त्यांना देखील कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. त्यावर अखेर हडपसर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन फ्लॅटची पाहणी केली. त्यावेळी त्या फ्लॅटमध्ये ३५० मांजरी असल्याचे आढळून आले.
View this post on Instagram
३५० मांजरांमुळे काही आजार पसरू शकतात, त्यामुळे त्वरित योग्य ती कारवाई करावी. गेल्या ५ वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असून, प्रशासनाने योग्य पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यावरुन सोसायटीमधील रहिवाशांची तक्रार लक्षात घेऊन, मांजरी पाळणार्या संबधित सदनिकाधारकांना ४८ तासात मांजरी हलविण्यात यावे, अशी नोटीस पुणे महापालिकेच्या पशू संवर्धन अधिकाऱ्यांकडून बजाविण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मॅट्रिमोनिअल साईटवरची ओळख पडली महागात, लग्न होण्याआधीच आयटीमधील तरुणीसोबत घडला धक्कादायक प्रकार
-GBS: पाण्यामुळे नाही तर कोंबड्यांमुळे ‘जीबीएस’ची लागण; काय म्हणाले अजित पवार?
-महाराष्ट्र केसरी: राक्षे-मोहोळ कुस्ती पुन्हा रंगणार? ५ जणांची चौकशी समिती
-अजितदादांच्या ‘गुगली’ने मनसे नेत्याची दांडी! थेट म्हणाले “तुझ्या नेत्याला सांग..”