पुणे : राज्यासह पुण्यात गुइलेन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) आजाराचा प्रादुर्भाव वाढतच आहे. सध्या राज्यात रुग्णांची संख्या २०० पार झाली असून एकूण रुग्णसंख्या २१० वर पोहचली आहे. गुलेन बॅरी सिंड्रोममुळे सोमवारी काल पुणे शहरात आणखी एका मृत्यूची नोंद झाल्याने जीबीएसमुळे मृत्यू झालेल्या जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ९ वर पोहचली आहे.
आरोग्य विभागाच्या अहवालानुसार आतापर्यंत मृत्यू झालेल्या ९ जणांपैकी ४ मृत्यू जीबीएस आणि ५ संशयास्पद मृत्यू असल्याचे नमूद करण्यात आले आहे. वाघोली येथील ३४ वर्षीय व्यक्तीला आधी उपाचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ३ फेब्रुवारी रोजी त्याला ससून रुग्णालयात पाठवण्यात आले. रुग्णाला ३ ते ८ फेब्रुवारी या काळात रुग्णाच्या मानेच्या, श्वसनाच्या, चेहऱ्याच्या आणि गिळण्याच्या स्नायूंची शक्ती कमी झाली. त्याला ७ फेब्रुवारी रोजी श्वासोच्छ्वासाच्या आणि मानेच्या स्नायूंचा अर्धांगवायू झाला. रुग्णावर जीबीएसचे सर्व उपचार सुरू होते. पण दुर्दैवाने १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी रुग्णाला मृत घोषित करण्यात आले.
दरम्यान, या आजाराने बाधित रुग्णांवर शहरात विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु असून आतापर्यंत अनेक रुग्ण बरे झाले आहेत. ही बाब जरी दिलासादायक असली तरीही जीबीएसमुळे काही रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांनी विषेशत: पुणेकरांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
पाणी उकळून व गाळून प्यावे, उघड्यावरील व शिळे अन्न खाणे टाळावे, अचानकपणे हातापायाच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा जवळील शासकीय रुग्णालयात जावे.
महत्वाच्या बातम्या-
-शरद पवारांच्या ‘त्या’ आमदारानं घेतली अजित पवारांची भेट; नेमकं कारण काय?
-विधानसभेच्या पराभवाची धूळ झटकणार, राष्ट्रवादीला उभारी देण्यासाठी शरद पवार पुन्हा मैदानात
-‘आपल्याला पुणे जिंकायचंच’, बावनकुळेंचा नारा; पुण्यात भाजप ‘एकला चलो’?
-प्रसिद्ध कॅफेमधून ऑर्डर केला चॉकलेट शेक अन् डिलिव्हर झाला ‘उंदीर शेक’, पुढे काय झालं?
-रात्री-अपरात्री मांजराचे आवाज एक महिला अन् ३५० मांजरी; नेमका काय प्रकार?