पुणे : राज्यात गुइलेन बॅरी सिंड्रोम आजाराचा प्रादुर्भाव वाढतच आहे. राज्यात सर्वाधिक धोका हा पुणे शहरामध्ये असून पुण्यात आतापर्यंत राज्यात सध्या जीबीएसच्या रुग्णांची संख्या २०० पार झाली असून या आजारामुळे आतापर्यंत एकूण ८ जणांचा मृत्यू झाला. यापैकी सर्वाधिक मृत रुग्ण हे पुण्यातील आहेत. अशातच बुधवारी खडकवासला परिसरातील ५९ वर्षीय पुरुषाचा जीबीएसमुळे मृत्यू झाला असून शहरातील हा सातवा बळी आहे.
खडकवासल्यामधील ५९ वर्षीय रुग्णाला १० फेब्रुवारी रोजी नवले हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. या रुग्णाला अशक्तपणा जाणवत होता आणि जागेवरून हलता देखील येत नव्हते. एनसीव्ही तपासणी केल्यावर प्लाझ्मा फेरेसिसचे उपचार करण्यात आले. ११ फेब्रुवारी रोजी रुग्णाला कार्डिअॅक अरेस्टचा त्रास झाला. उपचार सुरु असतानाच या रुग्णाचा पहाटे ३.३० वाजता मृत्यू झाला, असे मृत्यू अहवालात सांगण्यात आले आहे.
दरम्यान, गुइलेन बॅरी सिंड्रोम या आजाराने बाधित असलेल्या रुग्णांपैकी ५४ रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत, तर २० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. पिण्याचे पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न खावे, शिजलेले अन्न आणि न शिजलेले कच्चे अन्न एकत्रित ठेऊ नका, वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्या, काहीही खाण्या किंवा पिण्याआधी हात स्वच्छ धुवा, हात किंवा पायांमध्ये अचानक वाढत जाणारा अशक्तपणा असल्यास त्वरित जवळच्या महानगरपालिका रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधा.
महत्वाच्या बातम्या-
-येरवडा-कात्रज प्रवास होणार सुसाट; ‘ट्वीन टनल’च्या निर्मितीला हिरवा झेंडा
-फर्स्ट अँड लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी मेट्रो इंटिग्रेटेड ई-बाइक फीडर सेवा ‘या’ १० स्टेशनवर सुरु
-‘ताबडतोब महाराष्ट्राची माफी मागा’; संजय राऊतांंच्या ‘त्या’ टिकेवरुन मनसे आक्रमक
-परिक्षेला गेला इंग्रजीचा पेपर पाहिला, अन् विद्यार्थ्यानं उचललं टोकाचं पाऊल
-शिवाजीनगर बसस्थानकाच्या कामाला मिळणार गती, अजित पवारांनी घेतली आढावा बैठक