पुणे : पुण्यासह राज्यभरात गुइलेन बॅरी सिंड्रोम (GBS) आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. जीबीएसमुळे पुण्यात आतापर्यंत ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तब्बल ५४ रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून २१ रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत. त्यामुळे राज्यात पुणे शहराला या आजाराचा सर्वाधित धोका आहे. दूषित पाण्यामुळे हा आजार होत असल्याचे निदान झाले असून बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढतच आहेत. आता जीबीएसच्या उद्रेकानंतर महिनाभराने राज्य सरकारला जाग आल्याचे दिसत आहे. राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
मुख्य सचिवांनी पुणे विभागातील जीबीएसचा प्रादुर्भाव असणाऱ्या क्षेत्रामध्ये शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे निर्देश दिले होते. यासाठी संबंधित यंत्रणांना तत्काळ कार्यवाही करण्यासही सांगितले होते. त्यानुसार, आता पाणीपुरवठा विभागाने राज्यात शुद्ध पाणी पुरवठा करण्याबाबत परिपत्रक काढले आहे. राज्य पाणी व स्वच्छता मिशन कार्यालयाला याबाबतचा एकत्रित मासिक अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला घरगुती नळ जोडणीद्वारे किमान प्रतिदिन प्रतिव्यक्ती ५५ लिटर शुद्ध पाणी पुरवठा करणे आवश्यक आहे. तसेच, ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या अंतर्गत ग्रामीण जनतेला गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी संबंधित यंत्रणांनी करावी, असे निर्देश परिपत्रकात दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यातून सुरुवात देशभरात पसरली पाळेमुळे, ११९६ कोटींच्या घोटाळ्याचे पुणे कनेक्शन
-‘राजकारणाचा पोरखेळ कोणी केला’ दिल्लीतील ‘त्या’ कार्यक्रमावरुन पुण्यात वादंग, नेमका काय प्रकार?
-पुण्यात शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ला ब्रेक, कमिटमेंटमुळे रखडला माजी आमदाराचा प्रवेश?
-मनसेच्या इशाऱ्यानंतर भाडिपाचा पुण्यातील ‘तो’ शो रद्द; सारंग साठ्ये म्हणाला, ‘आगीत तेल…’
-Entertainment: लग्नाआधी शारीरीक संबंध? ऐश्वर्या रायने स्पष्टच सांगितलं…