पुणे : पुण्यात गुइलिन बॅरी सिंड्रोम आजाराचा पुण्यात उद्रेक झाला आहे. शहरात रुग्णसंख्येची शंभरी पार झाली आहे. पुण्यातील बाधित रुग्णांपैकी ८० टक्के रुग्ण सिंहगड रोडवरील गावांमधील आहे. आता या गावातील नागरिकांचा आक्रोश सुरु आहे. केंद्रातील विशेष पथक आज (बुधवारी) बाधित गावांची पाहणी करण्यासाठी गेले. मात्र, पाहणी न करताच केंद्रीय पथक परतून जात होते. या पथकाला बाधित झालेल्या गावातील गावकऱ्यांनी घेराव घालत आक्रोश केल्याचं पहायला मिळालं. यावेळी केंद्रीय पथकासोबत पुणे महापालिकेचे कर्मचारी देखील उपस्थित होते.
जीबीएस आजाराचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाल्याने पुण्याच्या मध्यवर्ती भागातही शिरकाव झाला आहे. नांदेडमधील नागरिकांनी घेराव घालत गावातील लहान मुलांचा जीव धोक्यात आहे, गाव धोक्यात असताना पळून जावू नका. बाधित झालेल्या भागातील पाणवठ्यांची पाहणी करा, अशी मागणी लावून धरली आहे. मात्र, गावकऱ्यांनी घेराव घालताच केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांनी आमच्याकडे आता काहीच माहिती नसून माहिती घेतल्यानंतर सविस्तरपणे सांगू, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
केंद्र सरकारने जीबीएसच्या बाबतीत मदत करण्यासाठी एक उच्चस्तरीय तज्ज्ञ टीम पुण्यात पाठवली आहे. आरोग्य मंत्रालयाने ७ सदस्यांची टीम पाठवली आहे. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, संशोधन आणि इतर विभागातील तज्ज्ञ पथके काम करत आहेत. मात्र, केंद्रीय पथक पाहणी न करताच निघून गेल्याचा आरोप करत नागरिकांनी आक्रोश केला आहे.
बाधित असलेल्या भागातील आतापर्यंत २५,५७८ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. साधारणत: एका महिन्यात फक्त २ जीबीएस रुग्णांची नोंद होते. तथापि, अचानक ही संख्या वाढली आहे, असल्याचं आरोग्य विभागाचं म्हणणं आहे. ९ जानेवारी रोजी पुण्यातील रूग्णालयात दाखल झालेल्या रूग्णाची चाचणी GBS पॉझिटिव्ह आली, ही पहिलीच केस होती. पुण्यातील सक्रिय रुग्णांची संख्या शंभरी पार गेली आहे.त्यापैकी १९ रुग्ण हे ९ वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. ५०-८० वयोगटातील २३ रुग्ण आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-आश्चर्यकारक! गर्भवती महिलेच्या पोटात बाळ अन् बाळाच्या पोटात बाळ; नेमका काय प्रकार? वाचा…
-Pune GBS: 30 हजार घरांचे सर्व्हेक्षण अन् पालिकेने जाहीर केले जीबीएस बाधित क्षेत्र
-पुण्यात व्हिला तर मुंबईत फाईव्हस्टार फ्लॅट, पुण्याच्या माजी पोलीस आयुक्तांची ACB कडून चौकशी
-खळबळजनक! पालकांची खोटी सही केल्याचं शिक्षकांना सांगितलं म्हणून त्याने थेट सुपारीच देत…
-गुरुनं ओलांडली मर्यादा; अल्पवयीन विद्यार्थीनीला केलं प्रपोज, नकार देतात…