पुणे : पुणे शहरात जीबीएस (गुइलेन बॅरी सिंड्रोम) आजाराचा प्रादुर्भाव वाढत असून या आजारामुळे राज्यातील ४ तर फक्त पुण्यातील ३ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील सिंहगड रोडवरील भागामध्ये सर्वाधिक रुग्ण असून दूषित पाण्यामुळेच हा आजार होत असल्याचे आरोग्य मंत्री तसेच पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. त्यातच आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पुणे महापालिकेकडून या भागात खासगी टँकरने दिल्या जाणाऱ्या पाण्याच्या बोअरवेलची तपासणी केली असता धक्कादायक बाब समोर आली आहे. या भागात पाणी पुरविणाऱ्या सर्व १५ टँकर भरणा केंद्राच्या बोअरवेलच्या पाण्यात दूषित पाण्यात आढळणारा ई-कोलाय हा बॅक्टेरीया सापडला आहे. त्यामुळे, या सर्व टँकर भरणा केंद्रावर महापालिकेकडून कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी ही माहिती दिली आहे.
या सर्व केंद्राना तातडीने नोटीस बजाविण्यात येणार असून महापालिकेने दिलेली ब्लिचिंग पावडरचा वापर टँकरमध्ये करूनच नागरिकांना पाणी द्यावे, अशा सूचना दिल्या आहेत. त्याकडे दूर्लक्ष होत असल्याचे पुन्हा केलेल्या तपासणीत समोर आल्यास सार्वजनिक आरोग्यास हानी पोहचविण्याचा ठपका ठेवून हे भरणा केंद्र कायमची बंद केली जाणार आहेत, असे नंदकिशोर जगताप यांनी स्पष्ट केले आहे.
पुणे पालिकेकडून पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व टँकर भरणा केंद्रातील पाण्याचे नमुने घेण्यात आले होते. यामध्ये स्वारगेट, धायरी, मानाजी नगर, माळवाडी भागातील खासगी टँकर भरणा केंद्रातील पाण्याचे नमुने तपासण्यात आले. या पाण्याच्या नमुन्यांचा अहवाल ३० जानेवारी रोजी प्राप्त झाला असून यामध्ये सर्व १५ टँकर भरणा केंद्राच्या पाण्यात ई-कोलाय आणि कॉलीफार्म हा बॅक्टेरिया आढळला आहे. प्रति मिली. पाण्यात हे दोन्ही बॅक्टेरियाचे प्रमाण अधिक असल्याचे स्पष्ट असल्याचे अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.
सर्व टँकर भरणा केंद्राचे पाणी दूषित असून पिण्यायोग्य पाणी नाही. सर्व टँकर पुरवठादार हे पिण्यासाठी देत नसल्याचा दावा करत आहेत. मात्र, या पाण्यात ई-कोलाय आणि कॉलिफार्म हा बॅक्टेरिया आढळल्याने सर्वांना नोटीसा बजावल्या आहेत. तसेच हे पाणी देण्यापूर्वी त्यामध्ये ब्लिचिंग पावडर देऊनही मिसळली जात नाही त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे, असे नंदकिशोर जगताप म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-खाकी वर्दीला कलंक: हुक्का पार्लर चालकाकडून ‘तो’ पोलीस उपनिरीक्षक घेत होता २० हजारांचा हफ्ता
-‘भाजपने पुणेकरांची फसवणूक केली’; काँग्रेसच्या माजी आमदाराचा गंभीर आरोप
-Pune GBS: पुणेकरांची चिंता वाढली; शहरात एकूण किती मृत्यू?
-कसब्यात १५ हजार महिलांच्या उपस्थितीत “सन्मान स्त्री शक्तीचा” गौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न