पुणे : पुणे शहरात ‘गुईलेन बॅरी सिंड्रोम’ (Guillain Barre Syndrome) या दुर्मिळ आजाराने चांगलेच थैमान घातले आहे. या आजाराच्या रग्णसंख्येत वाढ होत असून शहरात आतापर्यंत रुग्ण ६७ रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांपैकी ३९ रुग्ण पुणे ग्रामीण, १३ रुग्ण पुणे महापालिका तर १२ रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ३ रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत.
राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या ६७ वर पोहोचली आहे. ४३ पुरुष आणि २४ महिला असून १३ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. २४ जणांवर अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरू आहेत. ज्या भागात रुग्ण आढळून आले त्या परिसरात आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून, रुग्णांचा शोध घेण्यात येत आहे. त्यामुळे आता महानगरपालिका आवश्यक त्या उपाययोजना करत असल्याचा दावा करत आहे. मात्र, स्थानिक नागरिकांकडून पालिकेच्या कारभाराकडे बोट दाखवलं जात आहे.
शहराच्या हद्दीतील ४६ रुग्णांपैकी ७० टक्के रुग्ण हे सिंहगड रस्त्यावरील धायरी, किरकटवाडी ते खडकवासलापर्यंतच्या भागातील आहेत. या भागातील पाण्याची तपासणी देखील केली जात आहे. या रूग्णसंख्येतील ८० टक्के रुग्णांमध्ये आधी उलटी, जुलाब असे पोटविकाराचे (गॅस्ट्रोइंटेस्टायनल) लक्षणे दिसून येता आहेत. तर काही रुग्णांमध्ये तीव्र लक्षणे दिसून येत असल्याने त्यांना खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.
काळजी काय घ्यावी?
- पिण्याचे पाणी आधी उकळा आणि नंतर प्या.
- भाज्या आणि फळे स्वच्छ धुतल्याशिवाय खाऊ नका.
- चिकन आणि मांस व्यवस्थित शिजवून खा.
- अंडी, माशांसह इतर पदार्थ कच्चे खाऊ नका.
- जेवणाआधी आणि स्वच्छतागृहाचा वापर केल्यानंतर साबणाने हात धुवा.
- खाण्याचे भांडे अथवा अन्नाची दुसऱ्याशी देवाणघेवाण करू नका.
- कच्चे अन्न आणि शिजवलेले अन्न वेगवेगळे ठेवा.
- स्वयंपाकघराचा ओटा आणि भांडी निर्जंतूक करून घ्या.
महत्वाच्या बातम्या-
-बिगारी कामगाराच्या झोपडीत ५ लाखांची रोकड जळून खाक; झोपडीत इतके पैसे आले कुठून?
-अजित पवार-शरद पवार एकत्र येणार?; दत्तात्रय भरणे म्हणाले…
-पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेसेनेची तयारी; ‘किती गेले नी किती राहिले’ची चाचपणी