पुणे : पुणे शहरात गेल्या महिन्याभरापासून गुइलेन बॅरी सिंड्रोम (GBS) या दुर्मिळ आजाराने थैमाना घातलं आहे. या दुर्मिळ आजाराने आतापर्यंत ८-९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या आजाराचे मुख्य कारण हे दूषित पाणी, दूषित अन्नपदार्थ खाल्याने होत असल्याचे पहिल्यांदा सांगण्यात आले होते. त्यानंतर शहरातील वॉटर टँकरचे पॉइंट बंद करण्यात आले. पाणी तपासण्यात आले. त्यानंतर शनिवारी उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जीबीएस आजार हा कोंबडीचे कच्चे मांस खाल्ल्याने होत असल्याचा दावा केला आहे.
जीबीएस हा आजार दूषित पाण्यामुळे नाही तर, कोंबड्यांचे कच्चे मांस खल्ल्यामुळे होतं असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे. दरम्यान ज्या भागात हा आजार पसरला तिथल्या कोंबड्यांची विल्हेवाट लावण्याची गरज नाही. तर कोंबड्याचे मांस घेतल्यानंतर ते अन्न पूर्णपणे शिजवून मगच खाल्ले पाहिजे, असा सल्ला यावेळी अजित पवारांनी दिला आहे.
आपल्याकडे खडकवासला भागात मधल्या काळात जे काही गुइलेन बॅरी सिंड्रोमचे रुग्ण आढळून आले. त्यात प्रथम दर्शनी असे वाटले होते की हा आजार पाण्यामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे होत आहे. मात्र खडकवासला भागातील काहींचे म्हणणे आहे की, कोंबड्यांचे मांस खाल्ल्याने हा आजार झाला आहे. मी या संदर्भात सविस्तर माहिती आता घेतली असून त्या बाबतीत माहिती देण्याच्या अनुषंगाने प्रेस नोट काढण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत.
जिथे हा आजार आढळून आला आहे त्या भागातील कोंबड्यांची विल्हेवाट लावण्याचे कारण नाही. पण कोंबड्यांचे मास घेतल्यानंतर ते अन्न पूर्णपणे शिजवून घेतलं पाहिजे. हा आजार अधिक वाढू नये, यासाठी नक्की काय केले पाहिजे, कोणत्या उपाययोजना करण्याची गरज आहे, याबाबत मार्गदर्शन करणारी माहिती नागरिकांना द्यावी, अशा सूचना विभागीय आयुक्तांसह आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत, असेही अजित पवारांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-महाराष्ट्र केसरी: राक्षे-मोहोळ कुस्ती पुन्हा रंगणार? ५ जणांची चौकशी समिती
-अजितदादांच्या ‘गुगली’ने मनसे नेत्याची दांडी! थेट म्हणाले “तुझ्या नेत्याला सांग..”
-ठाकरेंसाठी घेतला उदय सामतांशी पंगा, आता शिंदेसेनेत प्रवेशासाठी धडपड सुरू
-‘कॉमेडी शो’च्या नावाखाली अश्लिल भाषा; समय रैनाचा उठला बाजार, नेमकं घडलं काय?