पुणे : पुणे शहरामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सुरु आहे. अशातच आज ५ दिवसांच्या गणपती बाप्पाचे विसर्जन होणार आहे. त्यामुळे शहरात अनेक भागातील रस्ते आजपासून बंद असणार आहेत. वाहतूक कोंडी होऊ नये आणि लाडक्या बाप्पाचे विसर्जन व्यवस्थित व्हावे यासाठी प्रशासनाने शहरातील काही रस्ते बंद ठेवून वाहने पर्यायी मार्गाने वळवण्यात आले आहेत.
शहरातील मुख्य रस्ते टिळक रोड, लक्ष्मी रोड, शिवाजी रोज आणि बाजीराव रोड हे सकाळी आणि सायंकाळी बंद असणार आहेत. शहरातील मुख्य रस्ते बंद असल्याने नागरिकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे. टिळक रस्ता – (मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ते हिराबाग चौक) हा बंद असणार आहे. यासाठी पर्यायी मार्ग – जेधे चौक, नेहरू स्टेडियम समोरील एकेरी मार्गान जमनलाल बजाज पुतळा उजवीकडे वळून पूरम चौक आणि हिराबाग असा असणार आहे.
लक्ष्मी रस्ता – (हमजेखान चौक ते टिळक चौक) हा रस्ता बंद असणार आहे. यासाठी पर्यायी मार्ग – हुल्या मारुती चौक उजवीकडे वळून दारूवाला पूल मार्गे, हमजेखान चौक डावीकडे महाराणा प्रताप रोडने घोरपडी पेठ पोलिस चौकी- शंकर शेठ रोडने पुढे जावे. सोन्यामारुती चौक डावीकडे वळून मिर्जा गालीब रोड जंक्शन असा असणार आहे.
शिवाजी रस्ता – (गाडगीळ पुतळा चौक ते केशवराव जेये चौक, स्वारगेट) हा रस्ता बंद असून यासाठी पर्यायी मार्ग – शिवाजीनगर- स्वारगेटकडे जाताना स. गो. बर्वे चौक- जेएम रोड- अलका चौक टिळक रोड, शास्त्री रोडने सिमला चौक-कामगार पुतळा चौक- शाहीर अमर शेख बोल्हाई चौकमार्गे नेहरू रोडने पुढे. कुंभारवेस चौक : पवळे चौक, साततोटी चौक, उजवीकडे देवजी बाबा चौक, हमजेखान चौक, महाराणा प्रताप रोडमार्गे घोरपडी पेठ पोलिस चौकी, उद्यान, झगडे आळी ते शंकर शेठ रोड. दुचाकी वाहने गाडगीळ पुतळा, लालमहलपर्यंत सोढण्यात येतील, तेथून दुचाकीस्वारांनी डावीकडे फडके हौद चौकमार्गे दारूवाला पूलमार्गे पुढे इच्छितस्थळी जावू शकता.
बाजीराव रस्ता – (पूरम चौक ते एबीसी चौक) हा रस्ता बंद असून यासाठी पर्यायी मार्ग – पूरम चौक, टिळक रोडने टिळक चौक उजवीकडे वळून केळकर रस्त्याने आप्पा बळवंत चौक असा असणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मद्यधुंद नशेत चालकाने मनसे पदाधिकारी, त्यांच्या पत्नीच्या अंगावर घातला टेम्पो अन्…
-वनराज आंदेकर प्रकरणी मोठा ट्वीस्ट; ‘त्या’ आरोपीलाही ठोकल्या बेड्या
-ऐन विधानसभेच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; ‘हा’ माजी आमदार हाती घेणार ‘तुतारी’
-‘पिकतं तिथं विकत नसतं, बारामतीकरांना मी सोडून आमदार मिळावा’; अजितदादा असं का म्हणाले?
-विधान परिषदेच्या आमदारकीसाठी राष्ट्रवादीत कलह; बारामतीत कार्यकर्त्यांनी अडवला अजितदादांचा रस्ता