पुणे : गणेशोत्सवाला आता अवघे २ दिवस बाकी आहेत. पुणे शहर हे गणेशोत्सवासाठी चांगलचे प्रसिद्ध आहे. त्यातच भारतातील सर्वात पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा प्रसिद्ध गायक पद्मश्री कैलाश खेर यांच्या हस्ते होणार आहे. शनिवारी दुपारी १२ वा. ३० मि. वाजता होणार आहे. त्यापूर्वी ढोल ताशांच्या गजरात आणि जंगी मिरवणूक देखील निघणार आहे.
मंडळाचे उत्सव प्रमुख आणि विश्वस्त पुनीत बालन यांनी गणपती बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठापणेच्या कार्यक्रमाची माहिती दिली आहे. ‘गणेश चतुर्थीला सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी बाप्पाची आरती होईल. त्यानंतर मिरवणुकीला सुरवात होईल. सुरवातीला लाठीकाठी मर्दानी खेळ आणि शंखनाद होईल. त्यांनतर ७ वाद्य पथकांकडून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनासमोर ढोल-ताशांची सलामी दिली जाणार असल्याचे पुनीत बालन यांनी सांगितले आहे.
‘शिवमुद्रा, वाद्यवृंद, मानवंदना, श्री, नु. म. वी., कलावंत, श्रीराम ही ८ ढोल ताशा पथके बाप्पाच्या मिरवणुकीत सहभागी असणार आहेत. या सर्व पथकांच्या वादन मिरवणुकीने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या बाप्पाचे वाजत गाजत आगमन होणार आहे. विशेष म्हणजे १३२ वर्षानंतर प्रथमच यावर्षी बाप्पाच्या रथाला बैलजोडी न लावता कार्यकर्ते हा रथ ओढणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची वाजत-गाजत मिरवणुकीनंतर प्रसिद्ध गायक पद्मश्री कैलाश खेर यांच्या प्राणप्रतिष्ठा होणार आहे. तरी सर्व गणेश भक्तांनी या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्याची विनंती पुनीत बालन यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-काँग्रेसमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर; धंगेकरांच्या उमेदवारीला कोणी केला विरोध?
-वडगाव शेरीत भाजपला गळती? पंकजा मुंडेंच्या बैठकीला माजी आमदारासह नगरसेवकांची दांडी
-वनराज आंदेकर हत्येनंतर पुण्यात टोळीयुद्ध भडकणार?; वडिल सुर्यकांत आंदेकरांनी घेतली शपथ
-पुणे वनराज आंदेकर खून प्रकरण: पोलिसांनी तीघांना घेतलं ताब्यात, खूनाचं कारण काय?
-पुणे हादरले! राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरांवर गोळीबार; प्रकृती गंभीर