पुणे : पुणे शहरात एका बड्या बापाच्या लेकाने सकाळच्या प्रहरी सिग्नलवर धिंगाणा घातला. पुण्यातील शास्त्रीनगरमध्ये दारुच्या नशेत लघुशंका आणि अश्लील चाळे करत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर परिसरात संतपाची लाट उसळली आहे. या तरूणाची ओळख पटली असून, त्याचे वडिल हॉटेल व्यवसायिक आहेत. गौरव मनोज अहुजा असे तरूणाचे नाव असून, त्याच्या वडिलांचे नाव मनोज रमेश अहुजा आहे. या प्रकरणाबाबत त्याच्या वडिलांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
‘तो माझा मुलगा आहे, याची मला लाज वाटते. पोलिसांनी मला शास्त्रीनगर पोलीस ठाण्यात बोलावले आहे. व्हिडिओमध्ये जी गाडी दिसत आहे ती माझ्या नावावर आहे. माझ्या मुलानं सिग्नलवर लघु शंका केली नाही तर, माझ्या तोंडावर केली आहे’, अशा शब्दात त्याच्या वडिलांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, येरवडा भागातील पुणे-नगर रोडवरील शास्त्रीनगर चौकात सिग्नलवर भर रस्त्यात गाडी उभी करुन या तरुणाने अश्लील चाळे केले. MH-12 RF8419 असा या बीएमडब्लू कारचा नंबर असून यामध्ये आणखी एक जण बसलेला होता. दोघेही प्रचंड दारुच्या नशेत होते. त्यांना धड चालताही येत नव्हतं. चौकात अश्लील चाळे करुन झाल्यावर दोघे भरधार वेगाने गाडी चालवत वाघोलीच्या दिशेने गेले. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-बड्या बापाच्या लेकाचा माज; दारुच्या नशेत रस्त्यावर अश्लील चाळे, पाहा व्हिडीओ
-स्वारगेट अत्याचार: ‘माझ्या बदनामीला जबाबदार कोण?’ पीडितेच्या प्रश्नावर पोलीस काय म्हणाले?
-पुण्याला मिळणार आणखी एक आमदार; मानकर अन् मुळीकांच्या नावाची जोरदार चर्चा
-‘रावण रेपिस्ट पण त्याने कधीही परस्त्रीला हातही…’; जया किशोरींच्या वक्तव्याने खळबळ