पुणे : पुणे शहरातील एफसी रोडवरील एल थ्री लिक्विड लेजर लाऊंज या हॉटेलमध्ये शनिवारी पहाटे ५ वाजेपर्यंत मद्य पार्टी आणि त्यामधून ड्रग्ज सेवनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. या सर्व प्रकरणावरुन ज्या पोलीस हद्दीत हा प्रकार समोर आला त्या ठिकाणच्या पोलीस निरिक्षकांना निलंबित करण्याचे आदेश केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आदेश दिले होते. त्यानंतर एल ३ हॉटेलमधील मध्यरात्री चालणारी पार्टी आणि ड्रग्ज सेवन प्रकणारात शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक (गुन्हे) अनिल माने आणि सहायक पोलीस निरिक्षक दिनेश पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे.
मुरलीधर मोहोळ यांच्या आदेशानंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अनिल माने आणि सहायक पोलीस निरिक्षक दिनेश पाटील यांनी निलंबित करण्यात आले आहे.
‘पुण्यातील अमली पदार्थ सेवन करतानाच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी आपल्या सूचनेनंतर मोठी कारवाई करण्यात आली, असून ज्या हद्दीतील हा प्रकार आहे, त्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे पोलीस निरिक्षक, सहायक पोलीस निरिक्षक यांना निलंबित करण्यात आले आहे’, असे मुरलीधर मोहोळ म्हणाले आहेत.
‘त्या’ व्हायरल व्हिडिओ प्रकरणी शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक निलंबित…
पुण्यातील अमली पदार्थ सेवन करतानाच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी आपल्या सूचनेनंतर मोठी कारवाई करण्यात आली असून ज्या हद्दीतील हा प्रकार आहे, त्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे पोलीस निरिक्षक, सहायक पोलीस निरिक्षक…
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) June 24, 2024
‘निलंबनाची कारवाई ही तत्काळची असली तरी पूर्ण पुणे शहरात अमली पदार्थ विरोधात पुणे पोलीसांची स्वतंत्र मोहिम आणि त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा, मनुष्यबळ नियुक्त करण्याची सूचनाही आयुक्तांना केली आहे. सर्व महाविद्यालये, पब्स, हॅाटेल्स, संशयास्पद ठिकाणे येथे त्वरीत ही शोधमोहिम कडक कारवाईसह करण्यात यावी आणि अंमली पदार्थ पुणे शहरात उपलब्ध होतात कसे? याच्या मुळाशी पोहचण्यासाठी प्रभावी तपास मोहिम सुरू करण्यात यावी’, अशाही सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, या प्रकरणात एकूण ५ जणांना ताब्यात घेण्यात आले असून २ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यापाठोपाठ आता पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात ‘नाईट लाईफ’ला बंदी नाहीच; शहरातील ‘त्या’ हॉटेलमध्ये पहाटेपर्यंत मद्य अन् ड्रग्ज पार्टी
-आरक्षणाचा तिढा सुटणार? ओमराजे निंबाळकरांनी सुचवला ‘हा’ मार्ग