पुणे : पुणे शहराला सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. अशाच या पुण्यात गेल्या काही महिन्यांपासून ड्रग्ज प्रकरणाने हैराण केले आहे. पुणे हे ड्रग्जनगरी झाले आहे. शहरामध्ये देशातील सर्वात मोठे ड्रग्ज प्रकरण उघडकीस आले. ललित पाटील प्रकरणानंतरही शहरामध्ये अनेक प्रकरणे समोर आले आहेत. अशातच आता आणखी एक ड्रग्ज रॅकेट समोर आले आहे.
विश्रांतवाडी परिसरात ड्रग्जचा साठा पुणे पोलिसांनी जप्त केला आहे. या सापडलेल्या ड्रग्जचे सध्या बाजार मूल्य १ कोटीपेक्षा जास्त असल्याची माहिती आहे. साधारण अर्धा किलो एमडी ड्रग्जचा साठा पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे.
पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातून हे १ कोटीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी ३ तरुणांना अटक केली आहे. लोहगाव येथील विघ्नहर्ता अपार्टमेंटमधून या ३ तरुणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या ताब्यातून १ कोटी रुपयाचे ४७१ ग्रॅम मेफेड्रोन हस्तगत करण्यात आले आहे.
श्रीनिवास संतोष गोदजे, रोहित शांताराम बेंडे आणि निमिश सुभाष अभनावे अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ललित पाटील प्रकरणानंतर आणि पबमध्ये सुरु असलेल्या ड्रग्ज तस्करीचे किती मोठे रॅकेट असल्याचा अंदाज लावला जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘नागपंचमीला गुलाबी रंगाची पुंगी वाजवून…’; अमोल कोल्हेंचा अजितदादांना टोला
-‘सरकार घाबरलंय त्यामुळे…’; विधानसभा निवडणूक कधी लागणार? जयंत पाटलांनी सांगितला मुहूर्त
-भोरमध्ये यंदा थोपटेंचा ‘संग्राम’ रोखणार मुळशी पॅटर्न अन् अजितदादा बारामतीचा बदला घेणार?
-राज्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे दाखवत मिळवली नोकरी; बच्चू कडूंच्या अभियाने फुटणार बिंग
-स्वातंत्र्यदिनापूर्वी दिल्ली पोलिसांकडून मोस्ट वाँटेड दहशतवादी रिझवानला अटक; पुण्याशी होता संबंध