पुणे : पुणे शहरामध्ये दिवसेंदिवस ड्रग्जचे प्रकरण वाढताना दिसत आहे. शहरातील मध्यवर्ती भागात एफसी रोडवरील असणाऱ्या एल थ्री बारमध्ये २ तरुण अंमली पदार्थांचे सेवन करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर या प्रकरणाचे सर्व स्तरातून पडसाद उमटले. राजकीय वर्तुळात देखील या मुद्द्यावरुन आरोप-प्रत्यारोप झाले. पुणे पोलिसांनी या प्रकरणी आता पर्यंत १३ जणांना अटक केली आहे.
पुण्यातील ड्रग्ज प्रकरणात आधी अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतून पुण्यात ड्रग्स रिटेलची चैन असल्याचे समोर आले असून ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यातील एक नायजेरियन तर २ आरोपी पुण्यातील आहे. तिन्ही आरोपींकडून ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. अटक केलेल्या आरोपींकडून मेफेड्रोन आणि कोकेन देखील जप्त करण्यात आले आहे. अटक केलेल्या एका ड्रग्ज पेडरलरने एल थ्री हॉटेलच्या पार्टीला ड्रग्स पुरवले होते.
दरम्यान, पुणे पोलिसांनी केलेल्या या कारवाईत असे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पुण्यात सुरू असलेला ड्रग्ज पार्ट्यांचा सुळसुळाट झाला असून आता पुण्याला ड्रग्जच्या नशेबाजांचा विळखा पडलाय का? आणि पुण्यात कायदा-सुव्यवस्था नावाची गोष्ट उरलीय का? असे संतप्त सवाल पुणेकर विचारत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-अनधिकृत पब्स आणि बारवर पुणे महापालिकेची धडक कारवाई; दिवसभरात तब्बल १३ हॉटेलवर हातोडा
-‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने’वरुन उद्धव ठाकरेंचा टोला; म्हणाले, ‘लेकींची काळजी घेताय पण,…’
-‘राज्य सरकारवर ७ लाख कोटींचे कर्ज ते कर्ज फेडायला पैसा नाही, अन्…’; एकनाथ खडसेंचा सवाल
-अजित पवारांची मोठी घोषणा; राज्यात ‘या’ ३ जिल्ह्यातील पेट्रोल-डिझेलचे दर होणार कमी